| |

कोथिंबीर फ्रिजमध्ये ठेवली तरीही खराब झाली?; जाणून घ्या कारणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जेवण म्हटलं का ते नुसतं चविष्ट नाही तर दिसायलाही आकर्षक असावे असे प्रत्येकालाच वाटते. मग हे जेवण आकर्षक कसे दिसेल याकडे महिलांचा अधिक कल असतो. आपल्या दैनंदिन आहारात असणारी कोथिंबीर हे काम अगदी उत्तमरीत्या करते. इतकेच नव्हे तर कोथिंबीर फोडणीत घातली तर त्याचा एक वेगळा आणि उत्तम ससा स्वाद जेवणाला येतो. पण आजकाल कोथिंबीरीला सोन्याचा भाव चढला आहे. पण काहीही झालं तरी कोथिंबीरीच्या हिरव्यागार पानांशिवाय खवय्यांचे जेवण हे अपूर्णच वाटते. वेगवेगळ्या चटण्या, वाटण, नाश्ता आणि विशेष म्हणजे वरण व पदार्थांची सजावट यासाठी कोथिंबीर हवीच. पण अनेकदा असे होते कि, बाजारातून कोथिंबीर आणली ती बरेच दिवस टिकावी म्हणून फ्रिजमध्ये ठेवली आणि वापरण्यासाठी बाहेर काढल्यानंतर ती खराब आढळली. असे का होते? असा अनेकदा प्रश्न पडतो. तर मैत्रिणींनो कोथिंबीर खराब होण्यामागे आपल्याच काही चुका कारणीभूत असतात. त्या समजून सुधारायला हव्या. या चुका कोणत्या हे जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) न धुता साठवणे – कोथिंबीर न धुता साठवायचा प्रयत्नच मुळी चुकीचा आहे. कारण या चुकीमुळे कोथिंबीर लवकर खराब होते. कोथिंबीर धुवून पंख्याखाली किंवा उन्हात सुकवा आणि मग फ्रिजमध्ये ठेवा.

२) ओली जुडी ठेवणे – अनेकदा पावसात भिजलेली किंवा टवटवीत राहावी म्हणून पाणी मारलेली कोथिंबीर आपण घेऊन येतो. यामुळे कोथिंबिरीची बांधलेली जुडी ओली होते आणि आतून खराब होऊ लागते. यासाठी कोथिंबीर आणल्यानंतर स्वच्छ करून धुवून सुकवून मगच साठवा. अन्यथा ओलाव्यामुळे ती कुजेल आणि तिला वास येईल.

३) देठं न कापता ठेवणे – कोथिंबीरीचे देठ न कापता साठवल्यास ती खराव होते. कारण कोथिंबीरच्या पानांच्या देठांमध्ये ओलावा असतो आणि हे पानं सडण्यास कारणीभूत ठरते.

३) फ्रिजमध्ये मोकळी ठेवणे – डब्यात न ठेवता अशीच कागदात किंवा सुट्टी कोथिंबीर ठेवली तर काही तासातच ती खराब होते. इतकंच नाही तर त्याचा वासही कमी होतो. शिवाय कोथिंबीर वाळते आणि सुकून जाते.

४) ओल्या डब्यात साठवणे – कोथिंबीर साठवताना अनेकदा ती डब्यात साठवली जाते. पण डबा ओला असेल तर कोथिंबीर साहजिकच खराब होते.

म्हणून.., कोथिंबीर आठवड्यापेक्षा जास्त काळ ताजी ठेवायची असेल, तर ती स्वच्छ धुवून आधी सुकवून घ्या. यानंतर स्वच्छ आणि कोरड्या अश्या हवाबंद डब्यात ती साठवा आणि फक्त कागदात गुंडाळा. अशीच मोकळी ठेवू नका. यामुळे कोथिंबीर जास्त काळ चांगली राहते आणि खराब होत नाही.