| |

टाळ्या वाजवा आणि प्रेशर पॉईंट जागवा; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्याला निरोगी राहायचे असेल तर वाईट सवयींची साथ सोडून चांगल्या सवयी आत्मसाद करणे अत्यंत गरजेचे आहे. असे आम्ही नाही तर तज्ञ सांगतात. मुळात आपल्या शरीरात एकुण ३४० प्रेशर पॉईंट असतात. यापैकी सुमारे २९ पॉईंट तळहातावर असतात. जे शरीराच्या विविध अवयवांशी अत्यंत जवळचा संबंध ठेवतात. आता हे सांगायचे कारण असे कि, अनेको व्यायामाचे प्रकार आणि योगाभ्यास यांमुळे आपले शरीर निरोगी राखण्यासाठी मदत होते. पण टाळी वाजवणे अर्थात क्लॅपिंग थेरेपीमुळे हे सर्व प्रेशर पॉईंट खडबडून जागे होतात. यामुळे हे पॉईंट उत्तेजित झाल्यास ब्लड सर्क्युलेशन वाढते. यामुळे शारीरिक व मानसिक विकास होण्यासाठी मदत मिळते.

देवाची आरती किंवा एखाद्याचा सत्कार केवळ अश्याच प्रसंगी टाळी वाजविणे यामुळे मूळ प्रेशर पॉईंटपर्यंत ती ऊर्जा प्रसारित होत नाही. परंतु दिवसभरातील केवळ १० मिनिटे जरी क्लॅपिंग केलं तरीही हे पॉईंट ऊर्जा एकत्रित करतात आणि आपल्या शरीराची चेतासंस्था जागृत करतात. इतकेच नव्हे तर शरीराची कार्यप्रणाली देखील प्रभावित करतात. चला तर जाणून घेऊयात क्लॅपिंग थेरेपीचे आरोग्यवर्धक फायदे कोणते ते खालीलप्रमाणे:-

१) सकाळी व्यायामाच्या वेळेत लागोपाठ टाळ्या वाजवल्याने शारीरीक आणि मानसिक संस्था बिंदू उत्तेजित होतात. यामुळे ताणतणाव दूर राहतो.

२) चांगल्या प्रकारे शारीरीक आणि मानसिक विकास होण्यासाठी जागृत प्रेशर पॉईंट्स मदत करतात.

३) टाळ्यांमुळे चेतासंस्था जागृत होते आणि दिवसभर शरीरात सकारात्मक उर्जेचा संचार राहतो. यामुळे कोणत्याही कामाचा क्षीण जाणवत नाही.

४) अख्खा दिवस मूड मस्त आणि चांगला राहतो. चिडचिड होत नाही.

५) याशिवाय पाठदुखीची समस्या असेल तर क्लॅपिंग थेरेपी सर्वोत्तम उपाय आहे. यामुळे पाठीशी संलग्न स्नायू मोकळे होतात आणि चांगला आराम मिळतो.

६) टाळी वाजवल्याने मेंदूची गती सुधारते. यामुळे स्मरणशक्तीसुद्धा वाढते.

७) लहान मुलांमध्ये एकाग्रता वाढविण्यासाठी आणि ऊर्जा टिकवण्यासाठी क्लॅपिंग थेरेपी मदत करते.

८) आपल्या शरीरात असेल सर्व प्रकारचे एनर्जी पॉईंट एकाचवेळी सलग टाळी वाजवल्याने उत्तेजित होतात. यामुळे दिवसभर एनर्जेटिक आणि उत्साही राहण्यासाठी रोज १०-१५ मिनिट टाळ्या वाजवा.

९) अ‍ॅक्यूप्रेशरच्या प्राचीन शास्त्रानुसार शरीराच्या प्रमुख अवयवांवरील दाब केंद्र पाय आणि तळहातावर असतात. जर या दाब केंद्रांचे मालिश केले तर अनेक आजारांपासून आराम मिळू शकतो.