Clove
|

Cloves Side Effects भाग 4 : लवंगचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण भाग १ मध्ये आयुर्वेदानुसार लवंग आरोग्यासाठी कशी आणि का फायदेशीर असते हे जाणून घेतले. यानंतर भाग २ मध्ये आपण लवंग खाण्याचे फायदे जाणून घेतले. पुढे भाग ३ मध्ये लवंगेचा दैनंदिन जीवनात कसा वापर करावा हे जाणून घेतले. इतके फायदे जाणून घेतल्यानंतर लवंग आयुष्यात किती गरजेची आहे हे तुम्हाला समजले असेल. पण ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाल्ला जात नाही. तसेच एखादी गोष्ट फायदेशीर आहे म्हणून तिचा अतिरेक करणे अंगलट येऊ शकते. याकरिता आज आपण भाग ४ मध्ये लवंगेचा अतिवापर केल्यास होणारे नुकसानही जाणून घेऊ. (Cloves Side Effects)

लवंगचा अतिवापर (Cloves Side Effects) आरोग्यासाठी हानिकारक

लवंग खाण्याचे फायदे जितके प्रभावी तितकेच प्रमाण चुकल्यास नुकसान करणारे देखील ठरू शकते. तर आपण अति लवंग खाल्ल्यास आरोग्याचे काय नुकसान होते हे जाणून घेऊया खालीलप्रमाणे:-

लवंगेचे अधिक सेवन केल्याचे त्याचे विष तयार होते आणि आरोग्यविषयक अनेक तक्रारी संभवतात.

लवंग अति प्रमाणात खाल्ल्यातील त्यातील संयुगे रक्त प्रमाणापेक्षा अधिक पातळ करतात.

लवंगेतील काही गूण एका मात्रेपेक्षा अधिक शरीरातील गेल्याच लिव्हर डॅमेज होऊ शकते.

लवंगेतील उष्ण गुणधर्म डोळ्यांमध्ये जळजळ निर्माण करते. यामुळे डोळ्यांचे नुकसान होते.

लवंग एका प्रमाणापेक्षा अधिक खाल्ल्यामुळे पुरुषांमधील टेस्टोस्टेरोन नावाचे हार्मोन कमी होऊ शकते.

लवंग जास्त खाणे वा चघळणे ऍलर्जीचे कारण ठरू शकते. यामुळे एकतर तोंडाचे नुकसान होते नाहीतर त्वचेचे नुकसान होते.

स्त्रियांनी आपल्या गर्भारपणात लवंगेचे सेवन करूच नये.

मित्रांनो आपण लवंगेविषयी सविस्तर माहिती घेतली आहे. त्यामुळे आता दैनंदिन जीवनात जेव्हा लवंगेचा वापर कराल तेव्हा आरोग्याच्या बाबतीत हेळसांड करू नका आणि आवश्यक बाबींकडे दुर्लक्ष करू नका. कारण उत्तम आरोग्य हाच खरा दागिना!