coconut water
| |

Coconut Water | अल्सरेटिव्ह कोलायटिससाठी नारळ पाणी आहे फायदेशीर, जाणून घ्या सविस्तर

Coconut Water | एखाद्याला पोटाच्या अल्सरेटिव्ह कोलायटिस या आजाराने ग्रासले असेल तर त्याला आयुष्यभर त्रास होतो. दरम्यान, एम्समध्ये केलेल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये असे आढळून आले आहे की नारळाचे पाणी त्याच्या उपचारांसाठी उपयुक्त आहे. औषधासोबत नारळपाणी रोज रुग्णाला दिल्यास आराम मिळतो. एम्सचे हे संशोधन नुकतेच अमेरिकेच्या क्लिनिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

अमेरिकेच्या इंटरनॅशनल मेडिकल जर्नलनेही या संशोधनाला महत्त्व दिले आहे. AIIMS ने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या सहकार्याने अल्सरेटिव्ह कोलायटिसची मध्यम ते गंभीर आणि सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांच्या उपचारात चाचणी घेतली. 121 रुग्णांना दोन गटात विभागून ही चाचणी घेण्यात आली. ज्यामध्ये 54 टक्के पुरुष आणि 46 टक्के महिला रुग्णांचा समावेश होता. रुग्णांचे सरासरी वय 37 वर्षे होते. ते दोन ते साडेसात वर्षांपासून अल्सरेटिव्ह कोलायटिसने त्रस्त होते.

हेही वाचा – Jaiphal Skin Benefits | चेहऱ्यावर जायफळ वापरल्यास होतात अनेक फायदे, पाहा काय म्हणते आयुर्वेद

एम्सच्या गॅस्ट्रोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. विनीत आहुजा यांनी सांगितले की, या क्लिनिकल ट्रायलमध्ये अर्ध्या रुग्णांना अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांसह आठ आठवडे दररोज 400 मिली नारळाचे पाणी देण्यात आले. तर दुसऱ्या श्रेणीतील रुग्णांना औषधांसह बाटलीबंद चवीचे पाणी देण्यात आले. चाचणीमध्ये, नारळाच्या पाण्याचा वापर करणाऱ्या ५७.१ टक्के रुग्णांवर उपचाराचा चांगला परिणाम दिसून आला, तर इतर गटातील केवळ २८.३ टक्के रुग्णांवर उपचाराचा चांगला परिणाम झाल्याचे दिसून आले.

नारळ पाण्याचा वापर करणाऱ्या ५३.१ टक्के रुग्णांचे आजार कमी होऊन आराम मिळाला. दुसऱ्या श्रेणीतील केवळ २८.३ टक्के रुग्णांचे आजार बरे होऊ शकले. चाचणीमध्ये असेही आढळून आले की नारळाच्या पाण्याच्या वापरामुळे रुग्णांच्या शरीरातील आतड्यांतील मायक्रोबायोम (आतड्यात असलेले बॅक्टेरिया) देखील बदलतात. यामुळे अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या उपचारात औषधांसह नारळाच्या पाण्याचा वापर फायदेशीर ठरतो.

नारळ पाणी फायदेशीर आहे | Coconut Water

नारळाच्या पाण्यात पोटॅशियम असते.अल्सरेटिव्ह कोलायटिस या आजारात आतड्यांमध्ये सूज येऊन जखमासारखे व्रण तयार होतात. त्यामुळे रुग्णांना पोटदुखी, जुलाब आणि रक्तस्त्रावाचा त्रास होतो. याशिवाय ताप येतो आणि शरीराचे वजन कमी होऊ लागते. डॉ.विनीत आहुजा यांनी सांगितले की, हा आयुष्यभर राहणारा आजार आहे. उपचारासाठी रुग्णाला रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित करणारी औषधेही द्यावी लागतात. नारळाच्या पाण्यात पोटॅशियम असते. पोटॅशियममध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे लक्षात घेऊन त्याची चाचणी घेण्यात आली आणि त्याचे परिणाम उत्साहवर्धक आढळले. उपचार म्हणून वापरण्यासाठी भविष्यात अधिक संशोधन आवश्यक आहे.