Colon Cancer Treatment Part 2 : आतड्याच्या कर्करोगाचे निदान कसे होते..?; जाणून घ्या उपचार

0
326
colon cancer treatment marathi information
आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन । कर्करोगाचे विविध प्रकार आहेत. यापैकी एक म्हणजे आतड्याचा कर्करोग. हा रोग विविध कारणांमुळे होऊ शकतो. याला ‘कोलोरेक्टल कर्करोग’ म्हणून ओळखला जातो. हा कर्करोग सहज समजून येण्यात अडचण येते. ज्यामुळे बराच काळ माणसाच्या शरीरात राहिल्याने याची वाढ होते. परिणामी उपचारांना उशीर झाल्यास माणूस दगावण्याची शक्यता बळावते. (Cancer Treatment)

Bowel Cancer

आतड्याच्या कर्करोगाला ‘कोलन कर्करोग’ (Colon Cancer Treatment) किंवा ‘गुदाशय कर्करोग’ म्हणून ओळखले जाते. सामान्यपणे अनुवांशिक किंवा दैनंदिन सवयींमुळे हा आजार होतो. योग्य वेळी याचे निदान झाल्यास उपचार घेता येतात. ज्यामुळे जगण्याची शक्यता वाढते. चला तर जाणून घेऊया आतड्याच्या कर्करोगाचे निदान कसे होते आणि त्यावर काय उपचार करता येतात ते खालीलप्रमाणे:-

Bowel Cancer

० आतड्याच्या कर्करोगाचे निदान कसे होते..?

अनेक प्रकारच्या चाचण्यांच्या माध्यमातून आतड्याच्या कर्करोगाचे निदान केले जाते. यामध्ये सुरुवातीला डॉक्टर रुग्णाची संपूर्ण शारीरिक तपासणी करतात. यामध्ये ओटीपोटात सूज आहे का..? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. तसेच, डिजिटल रेक्टलच्या सहाय्याने गुदाशय वा गुदद्वारातील गाठी आणि सूज यांची तपासणी केली जाते. याशिवाय रक्त तपासणी, कोलोनोस्कोपी, एमआरआय, सीटी स्कॅन आदी तपासण्यादेखील केल्या जातात.

० आतड्याच्या कर्करोगावर काय उपचार करतात..?

आतड्याचा कर्करोग सुरुवातीला आढळून आल्यास तो शस्त्रक्रियेद्वारे बरा करण्याचा प्रयत्न केला जातो. कोलेक्टोमी ही कोलन कर्करोगासाठी सर्वात सामान्य अशी शस्त्रक्रिया आहे. यासोबत रेडिएशन थेरपी आणि सोबत केमोथेरपीचंदेखील उपचारांमध्ये समावेश असतो.

० आतड्याचा कर्करोग टाळण्यासाठी काय करू नये आणि काय करावे..?

आतड्याचा कर्करोग टाळायचा असेल तर खालील सवयींना अंतर द्या.
धूम्रपान करणे, दारूचे सेवन करणे, प्रक्रिया केलेले मांस वारंवार खाणे, अनियमित आणि अनियंत्रित आहार. या सवयी बंद केल्यास आतड्याचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. (Intestine Cancer Treatment)

आतड्याचा कर्करोग टाळायचा असेल तर खालील सवयी आत्मसाद करा.
निरोगी आहार घ्या, भरपूर ताजी फळे आणि हिरव्या भाज्या आहारात खा. आहारात लाल मांसाचा वापर मर्यादित करा. आपले वजन नियंत्रित करा. यामूळे आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.


आवडल्यास नक्की शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here