|

कॉम्बिफ्लेम’चे अतिसेवन आरोग्यासाठी घातक; जाणून घ्या दुष्परिणाम

हॅलो आरोग्य ऑनलाईन। पेन किलर्स मध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध असणारी टॅबलेट म्हणजे कॉम्बिफ्लेम. ताप, सूज, स्नायूदुखी, डोकेदुखी, दातदुखी आणि स्त्रियांच्या मासिक पाळीतील दुखणे यांपैकी कोणत्याही दुखण्यावर हि टॅबलेट अतिशय प्रभावीरीत्या कार्यरत असते. त्यामुळे सर्रास कॉम्बिफ्लेम खाणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसतेय. पण मित्रांनो कॉम्बिफ्लेम खाणे जितके फायदेशीर आहे तितकेच आरोग्यासाठी घातकदेखील आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कॉम्बिफ्लेमचे अतिसेवन आरोग्यासाठी कसे घातक आहे हे सांगणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० कॉम्बिफ्लेम’चे अतिसेवन केल्यास होणारे दुष्परिणाम –
– पोट सुजणे
– चक्कर येणे
– मळमळ आणि उलटी होणे
– अतिसार
– बद्धकोष्ठता
– छातीत जळजळ
– अपचन
– गॅस होणे
– खाज येणे
– अॅलर्जी वाटणे
– सतत दीर्घकाळ कॉम्बिफ्लेम घेतल्याने पोटात ब्लीडिंग आणि किडनीसंबंधित समस्या होऊ शकतात.

 

० कॉम्बिफ्लेम खाताना घ्यावयाची काळजी

१) प्रत्येकाच्या वयाप्रमाणे कॉम्बिफ्लेमचा डोस निश्चित असल्यामुळे डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

२) कॉम्बिफ्लेम पाण्यासोबत घ्यावे. औषधी ला चावू अथवा तोडू नये.

३) कॉम्बिफ्लेमचे सेवन जेवणानंतरच करा.

४) खाली पोट कॉम्बिफ्लेम खाऊ नका.

५) कॉम्बिफ्लेम टॅबलेट घेण्याआधी व नंतर दारू पिऊ नये.

६) गर्भावस्थेदरम्यान कॉम्बिफ्लेम टॅबलेट घेणे असुरक्षित ठरू शकते म्हणून औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

७) बऱ्याचदा कॉम्बिफ्लेम घेतल्यावर गुंगी व झोप लागणे यासारख्या समस्या होतात. म्हणून औषध घेतल्याच्या नंतर वाहन चालवणे असुरक्षित आहे.