| | |

नारळाच्या तेलाचे सेवन करा आणि वजन करा कंट्रोल; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल दगदगीच्या आयुष्यात वजन नियंत्रणात ठेवणे म्हणजे मोठे आव्हानच वाटते. मग आपण विविध सोपे उपाय शोधू लागतो. यातील सर्वात सोपा उपाय आम्ही सांगणार आहोत. होय. आणि तुमच्या प्रश्नच उत्तर आहे नारळाचे तेल. अहो आश्चर्यचकित होऊ नका. कारण खरंच नारळाच्या तेलाचे सेवन केल्याने वजन नियंत्रणातही राहते आणि कमी सुद्धा करता येते. चला तर जाणून घेऊयात नारळाच्या तेलाचे फायदे :-

१) वजन कमी होते – नारळ तेलाचे नियमित सेवन केल्याने शरीरात चयापचय चांगले होते यामुळे वाढलेले वजन वेगाने कमी होण्यास मदत होते. नारळाच्या तेलामध्ये जे नैसर्गिक गुणधर्म असतात ते शरीराला चांगली एनर्जी मिळवून देतात व ट्रायग्लिसराईड लोरिक अॅसिडमुळे शरीरामध्ये तेल जमा होऊ देत नाहीत. यामुळे रोजच्या जेवणात नारळाच्या तेलाचा वापर करण्यात आला तर वेगाने वजन कमी होऊ लागते मात्र यासाठी रोज व्यायाम करायला हवा. तसेच व्यायाम करण्यापूर्वी गरम पाण्यात एक चमचा नारळ तेल मिसळून पिण्याने याचा लवकर परिणाम दिसून येतो. आयुर्वेदातदेखील याबाबत लिहीन ठेवलेले आहे.

२) प्रतिकारशक्ती सुधारते – नारळाच्या तेलात कॅप्रिक ऍसिड, लॉरीक ऍसिड, कॅप्रिलिक ऍसिड असते. जे रोग प्रतिकारशक्ती वेगाने वाढविण्यात मदत करते. शिवाय या तेलामध्ये कार्बोहायड्रेट्ससह कॅलरीजचे संतुलन असते. त्यामुळे आपण जर नारळाच्या तेलामध्ये पदार्थ केले आणि आठवडाभर केवळ तेच खाल्ले तर बाहेर खाण्याची आपली सवय सुटते.

३) चांगले कोलेस्टरॉल वाढते – नारळाच्या तेलाचे सेवन केल्यास रक्तामध्ये चांगले कोलेस्टरॉल वाढते. ज्यामुळे हृदयाचे भयानक आजारांपासून संरक्षण होते. आपण नेहमी पदार्थ बनवण्यासाठी जे तेल वापरतो त्यामध्ये बऱ्याच प्रमाण फॅट उपलब्ध असतं. जे आपल्या शरीरात जाऊन चरबीच्या स्वरूपात जमा होते आणि आपले कोलेस्ट्रॉल प्रमाणाबाहेर खराब मात्रेत वाढल्याने वजन वाढून जाडी वाढते. वास्तविक कच्च्या नारळाचे तेल वापरून बनवलेले पदार्थ फॅट फ्री असतात. जे आपलं वजन नियंत्रणात राखण्यासाठी मदत करतात आणि खराब कोलेस्ट्रॉल घटवतात.

४) मेटाबॉलिजम – नारळाचं तेल हे आपल्या शरीरातील मेटाबॉलिजम अधिक मजबूत करतात. हे तेल शरीरासाठी लागणाऱ्या मीडियम ट्रायग्लिसराईड लोरिक अॅसिडने बनलेले असते. हे एका प्रकारचं फॅटी अॅसिड आहे. आपल्या शरीराला रोजच्या आयुष्यात जितकी फॅटची गरज आहे तितकंच फॅट हे नारळ तेल निर्माण करते. जे अन्य तेलांच्या तुलनेत खूपच उत्तम आहे. त्यामुळे याचा वजन नियंत्रणात राखायला जास्त फायदा होतो. शिवाय मेटाबॉलिजम स्ट्रॉंग करण्यासाठीदेखील हे तेल प्रभावी आहे.