| |

उंची वाढवायची असेल तर या पदार्थांचे सेवन करा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। कुणाची उंची लहान असेल तर लोक त्यांची चेष्टा करण्याची संधी सोडत नाहीत. यामुळे उंचीने लहान असणाऱ्या लोकांच्या मनात न्यूनगंडाची भावना उत्पन्न होते. मग हे लोक उंची वाढवण्यासाठी विविध औषध उपाय करतात. मात्र, तरीही उंची वाढत नाही. मुळात पौष्टिक आहार न घेतल्यामुळे आपली वाढ आणि उंची खुंटते. यामुळे आपल्या शारीरिक विकासासाठी पौष्टिक आहार घेणे महत्वाचे आहे. म्हणुच चला जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनाने उंची वाढविण्यासाठी मदत होईल.

१) दूध – दूध हे पूर्ण अन्न आहे. कारण दुधात प्रथिने, कॅल्शियम आणि शरीरास आवश्यक इतर बरेच पोषक घटक असतात. ज्यांच्या सेवनाने उंची वाढण्यास मदत होते. यामुळे दिवसातून किमान एक ग्लास दूध प्यायल्याने शरीराची वाढ होण्यास मदत होते.

२) अंडी – अंड्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. शिवाय त्यात राइबोफ्लेविन, बायोटिन आणि लोहदेखील मुबलक प्रमाणात असतात. जे उंची वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे.  यामुळे अंड्याचे सेवन केल्याने आपली उंची झटपट वाढण्यास मदत होते.

३) चिकन – उंची वाढवण्यासाठी चिकन अत्यंत महत्वाचे कार्य करते. चिकनमध्ये बी जीवनसत्त्वे, प्रथिने असतात. जी आपली उंची वाढण्यास अत्यंत मदतयुक्त ठरतात.

४) बीन्स – बीन्समध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. जे आपल्या शरीराच्या वाढीस उर्जा देण्यासाठी आवश्यक पोषक पुरवतात. शिवाय बीन्समध्ये लोह आणि बी जीवनसत्त्व यांसह बरेच पोषक घटक समाविष्ट असतात. यामुळे आपली उंची वाढविण्यात ते मदत करतात.

५) बदाम – बदामात जीवनसत्त्वे आणि पौष्टिक घटकांचे योग्य प्रमाण समाविष्ट असते. जे उंची वाढविण्यासाठी आवश्यक असते. तसेच बदाम फायबर, मॅंगनीज आणि व्हिटॅमिन ई यांनी समृद्ध असतात. शिवाय बदाम आपल्या हाडांच्या आरोग्यास देखील फायदेशीर असतात आणि आपली उंची जलद वाढविण्यात मदत करतात.