| | |

आवळ्यासोबत एलोवेराचे सेवन ब्लड शुगर करते कंट्रोल; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल लोकांची जीवनशैली इतकी व्यस्त आणि दगदगीची आहे कि आजारी पडणाऱ्यांची संख्या दिवसागणिक मोठी होऊ लागली आहे. यात सर्वाधिक मधुमेहाच्या समस्येने ग्रासलेले लोक जास्त आहेत. या आअजराचे मुख्य कारण म्हणजे मानसिक ताण, शारीरिक श्रम आणि बदलती जीवनशैली. म्हणूनच आपण जीवनशैलीसोबत रोजच्या आहाराची काळजी घेतली पाहिजे. आजकाल या आजाराचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त असल्याचे आढळून आले आहे.

आपले स्वादुपिंड शरीरात इन्सुलिन हार्मोनचे उत्पादन कमी करते वा शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही, तेव्हा मधुमेह आजार होतो. यात महत्वाचे म्हणजे शरीरातील रक्तात असणाऱ्या साखरेवर वेळीच नियंत्रण मिळवणे. यासाठी डॉक्टरांचा सल्ला, औषधे आणि घरगुती उपाय आवश्यक आहेत. यात सर्वात प्रभावी घरगुती उपाय आहे आवळा आणि कोरफडीचे सेवन. होय. कारण हे दोन्ही पदार्थ प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासोबतच हृदय, किडनी, लिव्हर निरोगी ठेवण्यास सहाय्यक आहेत. चला तर जाणून घेऊयात रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी याचा वापर कसा करायचा आणि फायदे खालीलप्रमाणे:-

फायदेशीर कोरफड – कोरफडमध्ये एसेमनन नामक घटक असतो. या घटकाचा हायपोग्लायसेमिक (ग्लूकोज कमी करणारा) प्रभाव असतो. शिवाय, कोरफडमध्ये हायड्रोफिलिक फायबर, ग्लुकोमनन आणि फायटोस्टेरॉल सारखी इतर अनेक संयुगे देखील असतात जी ब्लड शुगर कमी करण्यास मदत करतात.

फायदेशीर आवळा – आवळा शरीरातील इन्सुलिन सक्रिय करते. यामुळे ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. शिवाय आवळा कोलेस्ट्रॉलची पातळीदेखील कमी करतो. आवळ्यामध्ये पॉलीफेनॉल असते. जे ब्लड शुगरमुळे निर्माण होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत करतात.

 वापर – रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवून मधुमेहापासून आपला बचाव करायचा असेल तर आवळ्याच्या पावडरसोबत कोरफडीचा गर खा. यासाठी खालील पद्धत वापरा :

– यासाठी दोन्ही जिन्नस समप्रमाणात घ्या आणि या मिश्रणाचे रिकाम्या पोटी सेवन करा.

– ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी कोरफडीचा ताजा गर आणि आवळा पावडर चूर्ण मिसळून दररोज सकाळी खा. यामुळे चयापचय वाढवण्यास मदत होते.

– कोरफडीचा रस रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. मात्र याचे प्रमाण फार थोडे असेल याची काळजी घ्या.

– तोंडाची चव बदलण्यासाठी आपण आवळा ज्यूसदेखील घेऊ शकता.

० महत्वाचे

– कोरफड खुप जास्त वापरू नका. शरीराचे नुकसान होईल. कोरफडीचे अतिसेवन डायरिया, हायपोकॅलीमिया (पोटेशियमची कमतरता), किडनी फेलियर, फोटोटॉक्सिसिटी आणि हायपरसेन्सिटिव्ह रिअ‍ॅक्शन म्हणजे त्वचेसंबंधी अ‍ॅलर्जी, ज्यामध्ये त्वचेची जळजळ आणि इतर समस्या निर्माण करतात.

– कोणतेही घरगुती आयुर्वेदिक उपाय करण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण समजत नसेल तर अगोदर तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मग सेवन करा.

– एखाद्या पदार्थाची एलर्जी असल्यास आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या औषधींचा वापर करू नये.