| |

वेलची आणि मधाचे सेवन टाळू शकते मोठंमोठे आजार; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। तुम्ही वेलची पाहाल तर किती लहान आणि बारीक असते, ते दिसत. पण तिचे गुणधर्म? तिच्या या एवढुश्या आकारावर जाऊन तिला कमी लेखू नका हा. कारण अनेक गुणांनी परिपूर्ण असणारी वेलची मूर्ती लहान पण कीर्ती महान अश्या काहीश्या प्रकारात येते. वेलचीमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. इतकेच काय तर कोरोना संसर्ग बरा होण्यास देखील वेलची मदतयुक्त आहे. पण हीच वेलची जर मधातून खाल्ली तर मोठमोठ्या आजाराच्या हातावर तुरी देऊ शकते. कसे ते जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) सक्षम रोगप्रतिकार शक्ती – रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी वेलची आणि मध अत्यंत फायदेशीर आहे. सर्दी, पडसं, कफ आणि खोकला यांसारख्या समस्येवर उपचार करण्यासाठी ह्याचे सेवन रामबाण उपाय ठरते. यासाठी भाजलेली वेलची मधासह खाल्लाने रोगप्रतिकार शक्ती वेगाने सक्षम आणि मजबूत होते.

२) पचनक्रियेत सुधार – आपली पचनक्रिया सुरळीत झाली तर कोणतेही पोटाशी संबंधित आजार सहजपणे होत नाहीत. यासाठी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करणे गरजेचे असते. यासाठी वेलची आणि मध एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.

३) मुखशुद्धी – तोंडाच्या दुर्गंधीमुळे बरेच लोकट्रस्ट असतात. ह्याला बॅड ब्रिथ असेही म्हटले जाते. मात्र वेलचीतील औषधी गुणधर्म आणि मधातील गंधक गुणधर्माच्या साहाय्याने हे टाळता येते. वेलची मधातून चघळण्यामुळे तोंडातून येणारा वास दूर होतो. शिवाय तोंडाचे कोणतेही रोग होत नाहीत आणि तोंडाचे आरोग्य राखण्यास मदत होते.

४) रोगमुक्त हृदय – चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल हृदयाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे लोक जीव गमावताना दिसत आहेत. चुकीच्या वेळी चुकीचे खाण्याच्या सवयी आणि मद्य, सिगारेटच्या सवयींमुळे लोक हृदयरोगाने बळी पडतात. अश्यावेळी वेलची आणि मध याचे सेवन केल्याने हृदय मजबूत होते.

५) कॅन्सरचा धोका टाळतो – मध आणि वेलची यांमध्ये कॅन्सर रोग विरोधी गुणधर्म आढळले आहेत. जे शरीरातील कॅन्सर रोगाच्या पेशी तयार होण्यास प्रतिबंध करतात. यामुळे निश्चितच कॅन्सरचा धोका अनेक पट कमी होतो. म्हणून वेलची आणि मध एकत्र घेतल्यास कॅन्सरची समस्या आपोआपच दूर होते.