| | |

कडीपत्त्याच्या तेलाचे सेवन केल्यास मिळतील ‘हे’ लाभ; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। भारतीय जेवणात वापरले जाणारे मसाले जेवणात चव आणि सुगंध वाढवतात. इतकेच नव्हे तर हे पदार्थ त्यांच्या औषधी गुणधर्मांमुळे देखील ओळखले जातात. जेवण बनविताना त्याचा सुगंध आणि चव वाढविण्यासाठी आणखी एक पदार्थ आवर्जून वापरला जातो तो म्हणजे कडीपत्ता. कडीपत्त्याचा फोडणीत केला जाणारा वापर अतिशय सर्वसामान्य असला तरी त्याची चव आणि सुगंध अतिशय प्रभावी असतो.

इतकेच नव्हे तर, कडीपत्त्याची पाने घातक पदार्थ निरोगी बनवण्यात प्रभावी असतात. मात्र केवळ पानांच्या जागी जर कडीपत्त्याचे तेल जेवण बनविताने वापरले तर अतिशय फायदेशीर ठरते. कारण सॅलड ड्रेसिंग, पास्ता आणि ब्रेडसाठी वापरल्या जाणाऱ्या ओरेगॅनो ऑईल किंवा बेसिल ऑईल यासारख्या इतर औषधी वनस्पती तेलांप्रमाणेच कढीपत्त्याच्या तेलाचा वापर केल्याने पदार्थामध्ये ताजेपणा, सुगंध आणि चव कायम राहते.

० कढीपत्त्याचे तेल कसे बनवायचे?
– कढीपत्त्याचे तेल ताजा कढीपत्ता वापरून बनवावे. यासाठी शुद्ध नारळाचे तेल आणि ताजा कढीपत्ता मिसळून हे तेल बनवले जाते. यासाठी नारळाच्या तेलात कढीपत्ता घाला आणि व्यवस्थित गरम करा. तेल गरम होताच गॅस बंद करा आणि मिश्रण व्यवस्थित मिसळा. यानंतर हे तेल एकतर गळून वापरावे किंवा मिश्रित स्वरूपात वापरावे. मात्र हे तेल एका काचेच्या बाटलीतच साठवून ठेवा आणि आवश्यकतेप्रमाणे वापर करा.

– कढीपत्ता हा नैसर्गिक पर्याय आहे. संशोधनानुसार हे शुद्ध झाले आहे कि, नैसर्गिकरित्या पाचन क्रिया सुधारण्यासाठी कडीपत्त्याची तेल फायदेशीर असते.

– पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि अतिसार सारख्या पोटाच्या समस्यांपासूनदेखील कडीपत्ता अगदी सहज आराम देऊ शकतो.

– कढीपत्त्यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. जे अशक्तपणा दूर ठेवण्यास आणि शरीरातील रक्त संतुलित ठेवण्यास मदत करते.

– कढीपत्त्यात तणाव कमी करण्याचे गुणधर्म समाविष्ट असतात. यामुळे कडीपत्त्याची तेल वापरल्याने केस जलद वाढण्यास मदत होते. शिवाय केस दाटदेखील होतात.

० काय सांगतात तज्ञ ?

– तज्ज्ञांच्या मते, असे मानले जाते की ताज्या कढीपत्त्याच्या नियमित सेवनाने मधुमेह देखील कमी होऊ शकतो. वजन कमी करण्यात देखील कढीपत्ता फायदेशीर आहे. कढीपत्त्याचे तेल सॅलड, सूप, करी किंवा इतर आहारामध्येही वापरले जाऊ शकते.

– तज्ज्ञांच्या मते, कढीपत्त्याच्या तेलाचा वापर आहारात केल्याने तुमचे जेवण अधिक स्वादिष्ट आणि निरोगी तयार होते. तसेच कढीपत्त्याच्या तेलाचा वापर खिचडी, हमस, सलाद, पिझ्झा या व्यतिरिक्त लोणचे, ढोकळा, विविध चटण्या अश्या इतर घरगुती पदार्थांची चव वाढवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.