| | |

खारीक आणि गुळाचे सेवन अनेको व्याधींना ठेवते दूर; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकल बदलती जीवन शैली हि विविध रोग व्याधींचे मूळ कारण होऊ लागली आहे. मात्र अनेकदा यामुळे अगदी कमी वयातच अनेकांना विविध आजार ग्रासताना दिसत आहे. अनेकदा काही आजार असे असतात ज्यांची स्पष्ट अशी लक्षणे नसतात मात्र ते विकार गंभीर आणि आरोग्यास हानिकारक असतात. सहसा रोजच्या दगदगीच्या आणि धावपळीच्या आयुष्यात आपल्याला आपले आरोग्य जपणे किंवा खाण्या पिण्याच्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देणे जमत नाही. मग अश्यावेळी आपण काय्त करावे ते सुचत नाही. तर अश्या समस्यांवर एक जालीम उपाय आहे. तो म्हणजे खारीक आणि गुळाचे सेवन. होय. दररोज सकाळी फक्त २ खारीक आणि गुळाचा एक लहान खडा खाल्ल्याने अनेक आजार आपल्यापासून दूर राहतात.

खारीक असा पदार्थ आहे ज्यात अनेक विविध प्रकारचे पाैष्टीक घटक असतात. जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतात. शिवाय खारीकमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. ज्यामुळे आपल्याला दिवभराची ऊर्जा या फक्त २ खारीका खाल्ल्यानेही मिळते. तर गुळामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक आढळतात. विशेषतः गुळात फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते आणि गुळामध्ये शरीराला आवश्यक ती खनिजे व जीवनसत्त्वे आढळतात. यामुळे आरोग्यास अनेको लाभ होतात. चला तर जाणून घेऊयात फायदे,

  • खारीक आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करते. शिवाय गूळ शरीराचे तापमान नियंत्रित करतो. यामुळे दोघांचेही सेवन शरीराला आतून स्वच्छ ठेवून त्वचेला बाहेरून चमक देतात.
  • खारीक आणि गूळ हे दमा आणि ब्रॉन्कायटीसपासून बचाव करण्यास मदत करतात. यामुळे ज्या लोकांना श्वसनासंबंधीत काही त्रास असेल त्यांनी आवर्जुन खारीक आणि गूळ खावेत.
  • खारीक आणि गूळ यांचे सेवन करणे वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. मुळात गूळ हा पोटॅशिअमचा चांगला स्त्रोत आहे. तर खारीक कॅलरीयुक्त पौष्टिक घटकांनी पूर्ण आहे. यामुळे शरीरात मेद साठत नाही. शिवाय अतिरिक्त चरबी कमी होते.
  • दूध आणि गुळ एकत्र करुन त्यासोबत खारीक खाल्ल्याने शरीराला आवश्यक ती ऊर्जा प्राप्त होते. यामुळे शरीराच्या मूलभूत गरज पूर्ण होतात आणि शरीराची रोग प्रतिकारक शक्तिदेखील वाढते.
  • खारीक आणि गुळाचे सेवन केले असता, हृदयाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. शिवाय रक्त पुरवठा सुरळित होतो आणि शारीरिक थकवादेखील दूर होतो.
  • दुधात गुळ मिसळून पिण्याने आणि खारकेचे तुकडे खाल्ल्याने शरीरातील रक्त स्वच्छ होण्यास मदत होते. शिवाय रक्तात गाठी तयार होत नाहीत आणि रक्तपुरवठा सुरळीतपणे सुरु राहतो.
  • खारीक आणि गुळाचे सेवन पचनक्रियेशी संबंधित सर्व समस्यांचे निरसन करतात. या व्यतिरिक्त कफ टाळण्यासाठीदेखील याचा फायदा होतो.