| | | |

कोरोनाच्या काळात ‘सालमन फिशचे’ सेवन ठरेल इम्युनिटी बुस्टर; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या शरीराला निरोगी आरोग्यासाठी सर्व पोषक तत्वांची गरज असते. हि पोषक तत्त्वे आवश्यक तितकी शरीरास प्राप्त झाली असता आपली इम्युनिटी अतिशय मजबूत राहते. यात शरीरातील प्रथिनांची कमतरता चिकन, मटण व अंडी यांच्या सेवनाने भरून काढली जाते. यांशिवाय आपल्या शरीराला माशाचीदेखील आवश्यकता असते. जर मांसाहार करणाऱ्या लोकांनी नियमितपणे माशांचे सेवन केले तर शरीर निरोगी ठेवण्यास त्यांना मदत होईल.

शिवाय मासे खाल्ल्याने स्मरणशक्तीदेखील सुधारते. यामुळे अनेकदा डॉक्टर मासे खाण्याचा सल्ला देतात. यात विशेष करून सालमन माश्याचा समावेश असतो. अनेकांना या माश्याबद्दल ठाऊक नसल्यामुळे त्याचे सेवन करणे टाळले जाते. मात्र या माश्याचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. चला तर सालमन माश्याबद्दल जाणून घेऊयात. शिवाय त्याच्या सेवनाने होणारे फायदेही माहित करून घेऊ.

* सालमन फिश – सालमन फिश हा एक माशाचा प्रकार आहे. हा मासा बहुधा ताज्या आणि मिठाच्या पाण्यातच आढळतो. या माश्याचा रंग साधारणपणे गुलाबी किंवा नारंगी असतो. शिवाय या माशाच्या अंगावरचा पृष्ठभाग चंदेरी तर त्याची अंतर्गत त्वचा गुलाबी रंगाची असते. हे मासे अगदी सहजोगत्या समुद्रात किंवा मोठ्या नद्यांमध्ये सापडतात.

* सलमान फिशचे फायदे:-

१) प्रोटिनासाठी सर्वोत्तम पर्याय – अंडी मांसाहारात प्रोटिनचा चांगला स्रोत आहेत मात्र सर्वोत्तम एकमात्र नव्हे. कारण प्रोटीनच्या बाबतीत सालमन फिश कोणत्याही मांसाहारी पदार्थांपेक्षा बिलकुल कमी नाही. सालमन फिशमध्ये इतर माश्यांपेक्षा अधिक प्रोटीन असते. त्यामुळे सालमन फिशचे सेवन केल्याने शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर केली जाऊ शकते. इतकेच नव्हे तर व्हिटॅमिन B आणि व्हिटॅमिन D साठी हे मासे सर्वोत्कृष्ट मानले जातात.

२) रोग प्रतिकारशक्ती वाढवते – तांबूस पिवळट सालमन माशाचे सेवन केल्याने आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. शिवाय सध्या कोरोनाच्या काळात रोग प्रतिकारशक्ती मजबूत असणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत सालमन फिश खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

३) वजनावर नियंत्रण ठेवते – बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लोकांमध्ये वजन वाढण्याची समस्या दिसून येत आहे. जंक फूड, फास्ट फूड किंवा तळलेले पदार्थ यांच्या सेवनाने वजन वेगाने वाढते. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी सालमन फिशचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते. कारण सालमन मासे फायबरयुक्त असतात. यांमुळे वजन नियंत्रित राहते. कारण त्यात खूप कमी कॅलरीज असतात.

४) केसांचे आरोग्य निरोगी ठेवते – अनेक स्त्रिया केस सुंदर बनविण्यासाठी फिश ऑइलचा वापर करतात. यात सालमन फिशचा समावेश असतो. कारण यामध्ये व्हिटॅमिन D3 असते जे केसांना निरोगी ठेवण्यास मदत करते. त्याच्या तेलाचा उपयोग केल्याने केस गळण्याची समस्या नष्ट होते आणि केसांना बळकटी मिळते.

५) त्वचेला चमक देते – प्रोटीनने समृद्ध असलेला सालमन फिश त्वचेला चमकदार बनविण्याचे काम करतो. प्रोटीनचे सेवन स्नायू आणि मानवी त्वचेच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात. त्वचा सुंदर बनविण्यासाठीदेखील ते फायदेशीर आहेत. यामुळे सालमन माश्याचे सेवन केल्याने त्वचा चमकदार होते. मात्र समस्या मोठी असेल तर, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच याचा अवलंब करा.