| |

अळूच्या पानांचे सेवन जितके चविष्ट तितके फायदेशीर; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अळूची पाने जितकी खायला चविष्ट तितकीच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अळूची भाजी अशी भाजी आहे जी कोणत्याही बाजारात अगदी सहजरित्या उपलब्ध असते. मात्र चवीसोबत आरोग्याची काळजी घेणारी हि भाजी फारशी लोकप्रिय नाही. मात्र अळूच्या पानांपासून तयार होणाऱ्या पदार्थांपैकी अळूची वडी खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे अळूची भाजी न खाणारे अळूची वडी खात असतील तरीही त्यांना या भाजीचा फायदा होऊ शकतो.
अळूच्या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्टसारखे अनेक पोषक तत्त्व मोठ्या प्रमाणात असते. मुख्य म्हणजे हे सर्व घटक आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे शरीराच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी अळूच्या पानांचे पदार्थ आहारात समाविष्ट करणे चांगले असते. जर तुम्हाला अळूच्या पानांचा आरोग्यासाठी होणारा लाभ जाणून घ्यायचा असेल तर हा लेख पूर्ण वाचा. कारण आम्ही तुम्हाला अळूच्या पानांचे शरीराच्या आरोग्याला होणारे फायदे सांगणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) डोळ्यांची दृष्टी मजबूत होते.
– अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ‘ए’चे प्रमाण अधिक असते. जे आपल्या डोळ्यांसाठी अधिक फायदेशीर आहे. तसेच डोळ्यांच्या मांसपेशी यामुळे मजबूत होतात. परिणामी आपली दृष्टी मजबूत होते आणि नजर कमी होण्याची समस्या उदभवत नाही.

२) रक्तदाबावर नियंत्रण राहते.
– आजकाल अनेकांना रक्तदाबाची समस्या असल्याचे आढळून येते. परंतु, आहारात जर अळूच्या पानांचा समावेश कराल तर यातील पोषक तत्वे शरीरातील रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत करतात. शिवाय अळूची पाने आहारात खाल्ल्याने तणावाची समस्या उदभवत नाही.

३) सांधेदुखीवर आराम मिळतो.
– जसजसे वय उतरत जाते, तसतसे सांध्यांच्या समस्या निर्माण होऊ लागतात. त्यामुळे जर तुम्हालाही सांधेदुखीचा त्रास असेल, तर दररोज अळूच्या पानांचे सेवन करा. कारण अळूच्या पानांमध्ये समाविष्ट असणारे पोषक घटक सांधेदुखी थांबवू शकतात. परिणामी अळूच्या पानांच्या सेवनामुळे सांधेदुखीवर आराम मिळतो..

४) पोटाच्या समस्या कमी होतात.
– पोटाच्या कोणत्याही समस्या असतील तर अळूची पाने यावर प्रभावी औषधी म्हणून काम करतात. अळूच्या पानांच्या सेवनामुळे पोटाशी संबंधित कोणतेही त्रास लगेच थांबतात. इतकेच नव्हे तर पचनक्रिया देखील सुरळीत होते.

५) वजन कमी करण्यासाठी लाभ होतो.
– वजन कमी करणे हि एक मोठी समस्या आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आपण नेहमीच एखाद्या पर्यायाच्या शोधात असतो. अळूची पाने त्यांपैकीच एक पर्याय आहे. कारण वजन कमी करण्यासाठी अळूची पाने फायदेशीर आहेत हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. अळूच्या पानांमध्ये असणारे फायबर हे पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.