| | |

जेवणानंतर या फळांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या आरोग्यासाठी विविध फळांचे सेवन अत्यंत लाभदायक असते. कारण यांमध्ये विविध प्रकारचे पोषण, न्‍यूट्रिशन, मिनरल्‍स आणि अन्य पौष्टिक घटक समाविष्ट असतात आणि हे घटक शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. अनेकांना जेवल्यानंतर फळे खायला फार आवडतात. मात्र तुम्हाला माहित आहे का? या गुणकारी फळांमध्ये काही फळे अशी असतात जी जेवणानंतर खाल्ली असता आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. होय, अशी काही फळे आहेत जी तुम्ही सकाळी नाश्त्यावेळी खाल्लीत तर शरीरासाठी फायदेशीर, मात्र दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर खाल्ली तर कमी फायदेशीर आणि अधिक नुकसानदायक ठरू शकतात. आयुर्वेदानुसार असे केल्याने मानवी पाचन तंत्रामध्ये समस्या वा बिघाड होऊ शकतो.

१) संत्र – संत्र हे फळ व्हिटॅमिन-सीने समृद्ध असते. यामुळे हे फळ एकतर जेवणापूर्वी १ तास किंवा जेवणानंतर १ तासाने खाणे फायदेशीर असते. अन्यथा पोटाचे विकार संभवतात.

२) मोसंबी – मोसंबी या फळामध्ये उच्च ग्लूकोज असते. म्हणून हे फळ फक्तं दुपारच्या वेळीच खाल्ले पाहिजे. कारण हे फळ डिहाइड्रेशन प्रतिबंधित करते आणि ऊर्जा देते.

३) केळी – केळी देखील कधीच जेवणानंतर लगेच खाऊ नये. जर तुम्ही जेवणानंतर केली लगेच खाल्ली तर शरीरातील कॅलरी आणि ग्लुकोजची पातळी वाढते.

४) द्राक्ष – द्राक्षांचा प्रभाव थंड असतो. ज्यामुळे ते शरीरात ओलावा टिकवून ठेवतात. मात्र जेवण झाल्यावर लगेच द्राक्ष खाल्ल्याने आपण जेवलेले अन्न पचन होण्यासाठी पोटात आवश्यक असणारी उष्णता शमते आणि परिणामी पचनक्रियेत अढथळा निर्माण होतो.

५) आंबा – आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे, आंबा जेवणानंतर लगेच खाऊ नये. कारण त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते आणि जेवणानंतर लगेच आंबा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी लगेच वाढते. मुख्य म्हणजे, मधुमेहाच्या रुग्णांनी याबाबत विशेष काळजी घ्यावी. वास्तविक, त्याचा तासीर गरम आहे म्हणुन जेवणं करण्यापूर्वी किंवा जेवणानंतर १ तासाने आंबा खाण्याचा सल्ला दिला जातो.

६) टरबूज – टरबूज खाण्याची योग्य वेळ म्हणजे दुपार असे मानले जाते. मात्र रात्रीच्या जेवणानंतर टरबूज खाऊ नये. असे केले असता इनडाइजेशनची समस्या उद्भवु शकते.