| |

अंड्याबरोबर या पदार्थांचे सेवन ठरू शकते हानिकारक; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। असे म्हणतात कि, दररोज अंडे खाणे हे तब्येतीसाठी चांगले असते. कारण अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, विटामीन आणि मिनरल्स असतात. तर कार्बोहायड्रेट्स अगदी कमी प्रमाणात असतात. शिवाय अंडे खाल्ल्याने वजन न वाढता उत्तम पोषण मिळते. असे हे अतिशय हेल्दी असणारे अँड जर का चुकीच्या पद्धतीने खाल्ले तर मात्र अनहेल्दी ठरू शकते. निषिद्ध आहारामुळे आपली पचनक्रिया बिघडते. तसेच यामुळे अशक्तपणा, थकवा आणि उलट्या, जुलाब यांसारख्या समस्या तोंड वर काढतात. म्हणून चुकीच्या पदार्थांसोबत अंडे खाणे टाळणे अतिशय आवश्यक आहे. मात्र या करीत आपल्याला ते पदार्थ ठाऊक असायला हवे. तर मग जाणून घेऊया कोणत्या पदार्थांबरोबर अंडे खाणे चुकीचे आहे.

१) चहा – अनेकांना सकाळच्या चहावेळी अंडे खाऊन नाश्ता करण्याची सवय असते. हे मान्य कि, सकाळी अंडे खाणे चांगले आहे. परंतु चहावर अंडे खाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानिकारक आहे. चहावर अंडे खाल्ल्याने ते टॉक्सिक बनते आणि ते टॉक्सीन्स शरीरात पसरतात. ज्याचा आपल्या पचन शक्तीवर परिणाम होतो आणि कॉन्स्टिपेशन होऊ शकते.

२) सोया मिल्क – अंड्यापासून मिळणाऱ्या प्रोटीनपेक्षा सोया मिल्कमधील सोया प्रोटीन प्रकृतीने वेगळे असते. यामुळे सोया मिल्क आणि अंडे एकावेळी खाल्ल्याने हे प्रोटीन शरीरात शोषणे अवघड होते. याचा पचनक्रियेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

३) साखर – अंड्यासोबत कोणत्याही स्वरूपात साखर खाल्ल्याने त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. साखर आणि अंडे दोन्हीत अमायनो ऍसिड असते. यामुळे त्यांचे एकत्र सेवन केल्याने शरीरात जास्त प्रमाणात अमायनो अॅसिड जाते जे टॉक्सिक असते आणि रक्तात गुठळ्या निर्माण होऊन अनेक आजार होण्याची शक्यता असते.

४) इतर मांसाहार – अंडे हे मांसाहारी लोकांचे अतिशय आवडते खाणे आहे. यामुळे अनेकदा लोक दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात अंडे आणि इतर मांसाहारी पदार्थ सोबत खाणे पसंत करतात. मात्र असे पदार्थ एकाचवेळी खाणे योग्य नाही. तसे पाहता याचा आरोग्यावर थेट परिणाम होत नाही. तरीही अंड्यात आणि मांसाहारी पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन व फॅटस् असतात. ते एकाचवेळी खाल्ल्याने शरीरात जडपणा येतो आणि पचनशक्ती कमकुवत होते, शिवाय सुस्ती येणे आणि भूक लागत नाही. यामुळे अनेक आजारांना आपसूकच निमंत्रण दिले जाते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *