| |

सतत जांभई येणे असू शकते मेंदूच्या विकाराचे लक्षण ; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। खरंतर जांभई येणे ही आपल्या शरीराशी संबंधित अत्यंत सामान्य आणि मुळात एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. अनेकदा दुसऱ्याला जांभई देताना पाहून आपोआप जांभई येते. हि जांभई क्षणीक आणि अगदी काही सेकंदांची असते. पण अनेकदा आपल्याला सततही जांभई येते. हे असे दररोज घडत असेल तर दुर्लक्ष करणे अंगाशी येऊ शकते. कारण इंटरनॅशनल जर्नल ऑफ अप्लाइड अँड बेसिक मेडिकलच्या संशोधनानुसार,जांभई आपल्या मेंदूचे तापमान नियंत्रित करते. तथापि, वारंवार किंवा जास्त प्रमाणात जांभई येणे हे शरीरातील बर्‍याच समस्यांचे कारण असू शकते. यामुळे जर आपल्याला सतत जांभई येत असेल तर मग खाली दिलेल्या समस्येचे हे प्रमुख लक्षण असू शकते. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) ब्रेन ट्युमर – सतत जांभई येत असेल आणि खूप थकल्यासारखे वाटत असेल तर डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्या. कारण हे मेंदूशी संबंधित एखाद्या विकाराचे लक्षण असू शकते. साधारणपणे अपूरी झोप, थकवा, कंटाळा या कारणांमुळे जांभई येते. पण वारंवार जांभई येत असेल तर त्यामागे अनेक मोठे धोके असू शकतात. संशोधनानुसार, वारंवार जांभई येणं हे ब्रेन ट्युमरचे संकेत देतात. त्याचप्रमाणे ह्रदय विकाराचा झटका येणे, एपिलेप्सी, शरीरातील तापमान नियंत्रित नसणे इ. समस्या जांभईमुळे डोकं वर काढतात.

२) एपिलप्सी – एपिलप्सी ही एक कंडीशन असून मेंदूच्या काही भागाचे कायमस्वरूपी नुकसान झाल्याने या स्थितीची निर्मिती होते. त्यामुळे मेंदूकडून दिल्या जाणार्‍या संकेतांपैकी एक प्रमुख संकेत म्हणजे जांभई. त्यामुळे सतत जांभई येत असेल तर वेळीच चाचणी करून त्याचे निदान करणे अधिक फायदेशीर ठरते. कारण हे लक्षण प्रामुख्याने मेंदूचे कार्य मंदावल्याने सांगते.

३) मेंदूसाठी अपुरा आराम – आरोग्य विषयक काही समस्या असतील आणि यामुळे दैनंदिन औषधांचा डोस सुरु असेल तर यांपैकी काही औषधांच्या परिणामामुळे देखील मरगळ किंवा सुस्ती येते. अश्यावेळी आपल्या मेंदूलाही आरामाची आवश्यकता असते. यामुळे जांभईचे प्रमाण वाढते. यात अ‍ॅन्टी डीप्रेसंट, काही पेनकिलर यांमुळे जांभई येऊ शकते.

४) मेंदूच्या सक्रियतेवर परिणाम – वारंवार जांभया येत असतील तर झोप अपुरी असल्याचे लक्षण मानले जाते. पण केवळ झोप अपुरी असेल तरच सतत जांभया येतात असे नाही. यामागे अन्य काही गंभीर कारणेदेखील असू शकतात. यात सातत्याने येणाऱ्या जांभया हे मानसिक तणावाचे लक्षण असू शकते. मानसिक तणाव जास्त असेल, तर त्याचा परिणाम मेंदूच्या सक्रियतेवरही होतो. त्यामुळे मेंदूला सक्रीय ठेवण्यासाठी प्राणवायूचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी वारंवार जांभया येऊ लागतात.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *