| |

आलाच राग तर असा करा कंट्रोल; जाणून घ्या टिप्स

हॅलो आरोग्य ऑनलाईन। रागीट स्वभाव सर्वांनाच अप्रिय आणि व्देष निर्माण करणारा असतो. त्यामुळे अश्या स्वभावाच्या व्यक्ती लोकांसाठी अत्यंत नावडत्या असू शकतात. त्यामुळे रागावर नियंत्रण हे हवंच. अनेकदा राग आपले नुकसान करण्यास कारणीभूत असतो. पण राग दाबून ठेवणे फार चुकीचे ठरते. त्यामुळे कोणत्याच समस्येचा उपाय निघत नाही. त्याकरीता स्वतःच्या मनातील कुत्सित आणि खुनशी तसेच नकारात्मक विचार आपल्यापासून अंतरावर ठेवा. सर्वांशी जुळवून घ्या आणि सर्वांना समजून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. तरच तुम्ही आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकता. यासाठी प्रत्येकाचे बोलणे ऐका व त्यास आपली बाजू प्रेमाने समजावून सांगा. आपली बाजू त्यांना न पटल्यास संबंधित विषयावर चर्चा करा पण वाद घालू नका. यामुळे नक्कीच कोणतातरी पर्याय समोर येईल. पण वादातून निव्वळ चिडचिड होईल आणि मस्तिष्क भारी होईल. म्हणूनच आज आपण रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी सहाय्यक असणाऱ्या टिप्स जाणून घेणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) उलटी गणना – जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा राग आलाच तर त्याच्याशी बोलणे टाळा आणि अजिबात नजर मिळवू नका. याउलट मनात १० पासून उलट अंकांची गणना खात्रीने सुरू ठेवा. आपले मन पूर्णपणे अंकांच्या उच्चारात केंद्रीत करा. बघ १००% तुमचा राग शांत होईल.

२) एक छोटासा ब्रेक – जर तूम्हाला अतितीव्र राग येत असेल तर वादांपासून लांब रहा. वाद होईल असे वाटताच बाजूला जा आणि शांत बसा. आपले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. यानंतर समोरचा व्यक्ती शांत झाला कि त्याच्याशी शांतपणे चर्चा करा. पण चर्चा न करता त्याच्याशी बोलणे टाळा.

३) प्राणायाम करा – पहाटेचा व्यायाम प्राणायाम आपला मुड दिवसभरासाठी चांगला करतो. खरंतर प्राणायाम हे मन केंद्रीत करण्याचा एक सराव आहे. तसेच श्वास केंद्रीत करण्याचा सराव राग घालवण्यास मदत करतो.

४) शांत निद्रा – कामाची दगदग आणि दगदगीच्या दिनचर्येमुळे आपले मन अस्थिर आणि चिडचिडे होते. त्यामुळे साहजिक राग लवकर येतो. पण जर मन आणि डोकं पूर्णपणे व्यायाम घेऊ शकले तर राग घालविण्यासाठी सहाय्य होते. आपला मेंदू शांत व स्थिर असेल तर चिडचिड होत नाही. म्हणूनच शांत निद्रा अर्थात निवांत झोप घेणे फार जरूरी आहे. कारण निवांत झोपेमुळे मेंदू शांत राहते. मन स्थिर राहते आणि मनस्थिती चांगली होते. त्यामूळे व्यक्ती मानसिकरित्या सक्षम आणि संयमी होतो.