korona

उन्हाळ्याच्या दिवसांत खरंच कमी होतोय का कोरोना

हॅलो आरोग्य ऑनलाईन । काही दिवसांपासून कोरोनाने सर्वाना त्रास दिला आहे . अनेक लोकांचे जीव फक्त कोरोनाच्या साथीने गेले आहेत . काही दिवसांपूर्वी कोरोनाचा प्रभाव हा कमी वाटत होता. पण आत्ता पुन्हा एकदा कोरोनाने आपले डोके वर काढले आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव हा वाढतच आहे. अनेक ठिकाणी पुन्हा एकदा बंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वजण फार चिंतेत आहेत. पुन्हा एकदा जर कोरोना चे संकट आले  तर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा कोलमडू शकते . त्यामुळे सर्वानी काळजी घेणे जास्त गरजेचे आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक जाणकारही चिंतेत आहेत. आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षीचं रेकॉर्ड जर पाहिलं तर वातावरण किंवा हवामान ठीक राहिलं तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते.याशिवाय कोरोनाची नवीन तीन रुपं अधिकच घातक ठरू शकतात . काही दिवसापूर्वी कोरोनाचे नवीन लक्षणे पुन्हा समोर आली आहेत . जर उन्हाळा कडक असेल तर कोरोना चा प्रभाव हा कमी होईल कि नाही याबाबत तज्ञ् काय म्हणतात याची माहिती घेऊया ….

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च च्या कोविड टास्क फोर्स ऑपरेशन ग्रुपचे प्रमुख डॉ. एन के अरोरा म्हणाले आहेत कि , कोरोनाची लक्षणे हि लहरींसारखी आहेत . त्यांची नवीन लक्षणे तर जास्त त्रासदायक आहेत . त्यांचा कोणत्याही हवामान हवामान किंवा काळ याच्याशी संबंधित नाहीत. उन्हाळा असो किंवा पावसाळा कोणत्याही ऋतूत याचा प्रभाव हा जास्त पडत असतो. मागील वर्षी कोरोनाने प्रवेश केला असला तरी गेल्या वर्षीच्या उन्हाळयाच्या दिवसांत सुद्धा कोरोनाचा प्रभाव हा काही केल्या कमी झाला नाही. त्यामुळे या विषाणूचा उष्णता किंवा थंडीशी काहीही संबंध नाही. तो एका लाटेच्या रुपात पसरत आहे.

कोरोना वाढण्याचे कारण म्हणजे ज्यावेळी लस आली याची बातमी आल्याने अनेक लोक कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता घराच्या बाहेर पडू लागले आहेत . त्यामुळे लोक सुद्धा काळजी करत नाहीत . या लसीच्या माध्यमातून असे निदर्शनास आले आहे कि , कोरोना ची लस ज्यावेळी घेतली गेली त्यावेळी काही ठराविक लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या . त्यामुळे गेल्यावर्षी जितकी चिंतेची बाब आहेत तेवढी चिंता करण्याचे काहीच कारण नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी मास्क आणि सॅनिडीझरचा वापर हा केला जात आहे.