coronavirus vaccine guidelines india

कोरोना लसीकरणाबाबत या गोष्टी तुम्हाला माहिती हव्यात; आरोग्य विभागाकडून गाईडलाईन्स जारी

हॅलो आरोग्य आॅनलाईन | देशभर आता कोरोना लसीकरण मोहीम सुरु झालीय. मात्र याबाबत लोकांच्या अनेक संभ्रम आहेत. तसेच अनेकांच्या मानात कोरोना लसीबाबत वेगवेगळे प्रश्नही आहेत. म्हणुनच आम्ही आज ही खास माहिती तुमच्यासाठी घेऊन आलोय. केरळ सरकारच्या आरोग्य विभागाने लसीकरणाबाबत काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. कोरोना लसीकरणाबाबत या गोष्टी तुम्हाला माहिती हव्यातच. coronavirus vaccine guidelines india

1) कोरोना लस ही १८ वर्षांपेक्षा जास्त वय असणार्‍यांना देण्यात येणार आहे

2) पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस आरोग्य कर्मचार्‍यांना दिली जाईल

3) दुसर्‍या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोना लस दिली जाईल. यामध्ये पोलिस, केंद्रीय सुरक्षा पथके, लष्कर, महापालिका, महानगरपालिका कर्मचारी, वित्त विभागाचे कर्मचारी आदींचा यामध्ये समावेश असेल.

4) तिसर्‍या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा अधिक वय असणार्‍यांना कोरोना लस दिली जाईल. तसेच वय 50 वर्षांपेक्षा कमी आहे मात्र आजारी आहेत अशांनाही यामध्ये कोरोनाची लस मिळेल.

5) यांनतर सामान्य नागरिकांना टप्प्याटप्प्याने कोरोना लस देण्यात येईल.

6) गरोदर महिला, एलर्जीची गंभीर समस्या असणारे लोक, ब्रेस्टफिडींग मदर्स आदींनी कोरोना लस घेऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे

7) कोरोना होऊन बरे झालेल्या व्यक्ती तसेच Heart, Neuro, Lungs, Kidney, Cancer, HIV या आजारांनी ग्रस्त असलेले लोक सुद्दा कोरोना लस घेऊ शकतात. coronavirus vaccine guidelines india

8) जर तुम्ही कोरोना व्यतिरिक्त इतर कोणती लस घेत असाल तर १४ दिवसांचा कालावधी राखून कोरोना लस घ्यावी.

9) तुम्ही कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर त्याच कोरोना लसीचा दुसरा डोस घ्यावा.

10) कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी तुमची रोगप्रतिकार शक्ती प्रभावी झालेली असेल.

11) लसीकरनानंतरही सर्वांनी मास्क परिधान करणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, हात धुणे गरजेचे आहे.

12) रॅश, डोके दुखणे, गुडखे दुखणे, उष्णता वाढणे Muscle Pain, Weariness आदी कोरोना लसीकरणाचे सामन्य साईड इफेक्ट आहेत.

13) तुम्ही घेतलेली कोरोना लस तुमच्या शरिरात मिसळत आहे आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढत आहे याचे वरिल साईड इफेक्ट्ा द्योतक आहेत.

14) वरिल लक्षणे आढळून आल्यास जवळील दवाखान्यात किंवा कोरोना लसीकरण केंद्रात जाऊन याबाबत माहिती द्या.

15) कोरोना लसीकरण हे कोरोना रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी महत्वाचे पाऊल आहे हे लक्षात ठेवा

16) जोपर्यंत सर्वांपर्यंत कोरोना लस पोहोचत नाही व सर्वांचे लसीकरण होत नाही तोपर्यंत मास्क घालणे, हात धुणे, सोशल डिस्टंसिंग ठेवणे याबाबत आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *