|

आपत्कालीन वापरासाठी Covovax लसीला परवानगी; WHO’ने घेतला मोठा निर्णय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरियंटने अर्थात ओमिक्रॉन व्हायरसने हातपाय पसरले आहेत. परिणामी विविध देश पुन्हा एकदा चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातही दिवसेंदिवस ओमिक्रॉनच्या रुग्णांत एक एक करून वाढ होताना दिसत आहे. ओमिक्रॉन सर्वसाधारण विषाणू म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नये असे आधीच जागतिक आरोग्य संघटना (WHO – World Health organization)ने सांगितले होते. यानंतर काही निकष आणि अभ्यासाद्वारे समोर आलेल्या माहितीमुळे आता WHOने आपत्कालीन वापरासाठी Covovax या नव्या लसीचा वापर करण्याची परवानगी दिली आहे.

ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यास लक्षात घेता WHO ने सीरम इन्स्टिट्यूटची लस, Covovax ला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. अदार पूनावाला यांनी ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली आहे. आदर पूनावाला हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. त्यांचे वडील डॉ. सायरस पूनावाला यांनी १९६६ मध्ये स्थापन केलेली, ही उत्पादित डोसच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठी लस उत्पादक आहे. सीरम इन्स्टिट्यूटने कोवोव्हॅक्स लस नोव्हावॅक्स कंपनीच्या सहकार्याने तयार केली आहे आणि आतापर्यंत झालेल्या सर्व चाचण्यांमध्ये ही लस खूप प्रभावी ठरली आहे.

परिणामी WHO’ने आपत्कालीन वापरासाठी नव्या लसीला परवानगी दिली आहे. WHO’च्या मुख्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कमी उत्पन्न असलेल्या देशांना या लसींचा खूप फायदा होईल आणि अल्पावधीत जलद लसीकरण करण्यास मदत होईल. नवीन व्हेरिएंटमध्ये लस हे एकमेव प्रभावी साधन आहे. जे लोकांना गंभीर आजारांपासून वाचवू शकते. याशिवाय कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लसीकरणाची स्थिती सुधारण्यासाठी कोवोव्हॅक्स लसीला परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती WHO’च्या डॉ. मारिएंजेला सिमाओ यांनी दिली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *