| | | |

गायीचे तूप देई सुंदर काळेभोर केस; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि सुंदर, लांबसडक आणि घनदाट केसांसाठी दररोज केसांना तेल लावणे फायदेशीर आहे. पण कधी केसांना तूप लावलं आहे का? हो.. हो..तूप. यात आश्चर्य वाटायचं कारण नाही. याचं कारण असं कि, केसांना गायीच्या तुपाने मसाज केलात तर तेलापेक्षा जास्त आणि मनासारखे फायदे मिळतात. ते हि कमी काळात. तुम्हाला माहित आहे का? केसांना तूप लावणे हा अतिशय जुना आणि पारंपरिक प्रकार आहे. अशी मान्यता आहे कि, तूप केसांना कोंड्यापासून दूर ठेवते. तसेच एका संशोधनात सिद्ध झाले आहे कि, जर गायीच्या तुपाचा वापर इतर घटकांसोबत केला तर ते मालासेझिया फर्फर नावाच्या बुरशीची वाढ थांबवता येते. हा एक फंगस असून कोंडा होण्‍याचे प्रमुख कारण मानले जाते. शिवाय तुपात बॅक्टरीयासोबत लढणारे अँटी बॅक्टेरियल गुणधर्म, व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-ई सारखे अँटिऑक्सिडंट गुणधर्मसुद्धा असतात. त्यामुळे केसगळतीची समस्या दूर होते. चला तर जाणून घेऊयात निरोगी केसांसाठी तुपाचे फायदे काय ते खालीलप्रमाणे :-

१) कोंडा गायब करा – आपल्या डोक्याच्या त्वचेतील कोरडेपणामुळे केसात कोंडा होतो. तो घालवायचा असेल तर तूप वापर. यासाठी आधी गायीचे देशी तूप हलके गरम करून आंघोळीच्या १ तास आधी टाळू आणि केसांना मालिश करा. यानंतर केस सौम्य शॅम्पूने धुवा. साधारण १ महिना केसांना तूप लावाल तर कोंडा कुठच्या कुठे गायब होईल कळणारही नाही.

२) केस गळती थांबवा – केसांची मुळे कमकुवत झाली की साहजिकच भरपूर केसगळती होते. यामुळे टक्कल पडू शकत. अशी केसगळती रोखण्यासाठी केसांना गायीच्या तुपाने मसाज करा. कारण तुपातील पोषक घटक केसांच्या मुळांना मजबूत करतात. रस्ताही टाळूपासून केसांच्या टोकापर्यंत तूप बोटांनी चांगलं लावा आणि तासाभराने सौम्य शॅम्पू वापरून केस धुवा.

३) पांढऱ्या केसांवर प्रभावी – वातावरणातील बदल, धूळ, प्रदूषण आणि खराब जीवनशैली यामुळे अकाली केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते. यासाठी गाईच्या तुपाने केसांच्या मुळांना दररोज रात्री मसाज करा. यामुळे अकाली केस पांढरे होणार नाहीत.

४) कोरड्या केसांसाठी लाभदायी – वातावरणात बदल झाला कि केस कोरडे होण्याची समस्या उदभवते. जर तुमचेही केस खूप कोरडे असतील तर यासाठी तुम्ही गायीच्या तुपाने मसाज करा. असे केल्यास केसांना नैसर्गिक हायड्रेशन मिळेल आणि ते नैसर्गिकरित्या मऊ, रेशमी होतील.

५) केसांना फाटे फुटणार नाहीत – अति उष्ण वातावरणामुळे केस कोरडे होतात आणि एका केसाला दोन टोक येतात. याला केसांना फाटे फुटणे असे म्हणतात. अशा स्थितीत केसांना तूप लावल्यास फाटे फुटणाऱ्या केसांची समस्या कमी होते. कारण तूप त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवते. परिणामी केसांना फाटे फुटण्याची समस्या दूर होते. यासाठी हलके कोमट गायीचे तूप हातावर घेऊन आंघोळीआधी अर्धातास केसांना नियमित लावा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *