| | |

क्रिमी कोकोनट स्मूदी जितकी टेस्टी तितकी हेल्दी; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मँगो, बनाना, चिकू असे कितीतरी वेगवेगळे फ्लेवर असणारे स्मूदी तुम्हाला फार आवडत असतील. पण कधी तुम्ही नारळाची स्मूदी चाखली आहात का? होय होय नारळाची स्मूदी. जर तुम्ही अजूनही या स्मूदीपासून अनभिज्ञ असाल तर एकदा जरूर टेस्ट कराच. कारण नारळाची स्मूदी दिसायला एकदम क्रिमी, चाखायला एकदम चवदार आणि मजेदार आहे. इतकंच काय तर हि स्मूदी जितकी टेस्ट तितकीच हेल्दीसुद्धा आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला स्मूदीसाठी लागणारे साहित्य, कृती आणि तिचे सेवन केल्यास होणारे फायदे सांगणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० साहित्य
कच्चा नारळ – १ १/२ कप
मध – ४ टीस्पून
लिंबाचा रस – १ टी. स्पून
काजू – ५
नारळाचे दूध – २ कप
लाइम झेस्ट – १/२ टी.स्पून
बदाम – ६

० कृती – नारळाची स्मूदी बनवण्यासाठी, आपल्याला वरील सर्व साहित्य ज्युसरच्या सहाय्याने एकत्रित करून घ्या. यानंतर त्यात मध आणि लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण पुन्हा काही बर्फाचे तुकडे घालून मिसळून घ्या. यानंतर एका ग्लासमध्ये ही स्मूदी घाला आणि आपल्या आवडीनुसार काजू बदाम व नारळाच्या सहाय्याने सजवा. झाली मस्त थंडगार, टेस्टी आणि हेल्दी स्मूदी तयार.

० फायदे

– नारळ आणि त्याचे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे नेहमी ताजेतवाने वाटते. शिवाय शरीर थंड राहते. नारळाच्या पाण्याव्यतिरिक्त कच्च्या नारळाला मऊ पांढरा लगदा अर्थात खोबऱ्याचा भाग असतो. हे खोबर मलाई म्हणून देखील ओळखले जाते जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दक्षिण भारतात या नारळाचे पदार्थ खूप आवडीने खाल्ले जातात. नारळाचे तेल, दूध आणि पाणी सर्वकाही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

– नारळाचा मऊ भाग पोषक तत्वांनी समृद्ध असतो. यात फायबर, मॅंगनीज, लोह, जस्त, फॉस्फरस आणि पोटॅशियम असे पोषक घटक असतात. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. नारळामध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात शिवाय यातील फायबर भूकेवर नियंत्रण मिळविण्यास मदत करते.

– वाढते वजन, अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आणि स्नायू मजबूत करण्यासाठी ही स्मूदी लाभदायक ठरते. यामुळे पचनप्रणाली व्यवस्थित राहते. यामुळे आपले पोट निरोगी राहते.

– नारळामध्ये संतृप्त चरबी असते. यामुळे शरीरातील चांगले कोलेस्टेरॉल वाढते. जे आपल्या हृदयासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपण त्याचे सेवन करू शकतो.