| | |

औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण काकडी; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। औषधी गुणधर्मयुक्त अशी पांढऱ्या, हिरव्या व पिवळसर रंगाची काकडी संपूर्ण भारत देशात सर्वत्र पिकते. निरोगी राहण्यासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे सर्व घटक काकडीत असतात. काकडीमध्ये उन्हाळी काकडी, क्षीरा कर्करी, राजील कर्कटी आणि हिरवी अखूड असे प्रकार आहेत आणि या सर्व प्रकारांत औषधी गुणधर्म ठासून भरलेले आहेत. जाणून घेऊयात औषधी गुणधर्म आणि त्यांचे फायदे.

  • औषधी गुणधर्म – आयुर्वेद सांगते कि, काकडी शीतल, पित्तशामक, पाचक आणि मूत्रल आहे. तर काकडीचे बी शीतल, मूत्रल व पुष्टीकारक आहे. या गुणधर्मामुळे काकडी खाल्ली असता शरीरातील अंतर्गत स्राव व मूत्रप्रमाण वाढते. पर्यायाने मूत्रविकार दूर होतात.
    शिवाय काकडीत विपुल प्रमाणात खनिजे आहेत. अनेक जण काकडीची साल काढून काकडी खातात; परंतु काकडीची साल काढूच नये. कारण हे काकडीच्या सालीलगतच क्षार व जीवनसत्त्वे यांचे विपुल प्रमाण असते.
    काकडीमध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ‘क’ जीवनसत्त्व, पोटॅशिअम, मीठ, मॅग्नेशिअम, गंधक, सिलिकॉन, ग्लोरीन, बम्लोरीन व तंतुमय पदार्थ ही पोषकद्रव्ये मिळतात. त्यामुळे सहसा काकडी कच्ची खावी. कारण कच्ची काकडी पौष्टिक व पचण्यास हलकी असते.
  • काकडीचे फायदे :-

१) नेहमीपेक्षा कमी भूक लागत असेल तर, काकडीचे काप करून पुदिना, काळे मीठ, लिंबू रस, मिरे व जिरेपूड घालून खावेत. यामुळे भुकेत वाढ होते आणिखाल्लेलं पचते.

२) काकडी ही पित्तशामक असते. यामुळे अपचन, उलटी, मळमळ, पोटात गुब्बारा धरणे या विकारांवर काकडीचा नियमित जेवणात वापर करावा.

३) शरीरावरील भाजलेल्या जखमेची आग होत असेल तर काकडीचा रस लावल्याने आग थांबते.

४) मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या हातापायांना जळजळ होण्याची समस्या असते. अशावेळी काकडीचे काप तळहातावर व तळपायावर चोळावेत. याने आराम मिळतो.

५) काकडी शीतल व सारक आहे. त्यामुळे मलावष्टंभाची तक्रार असणाऱ्यांनी काकडीचे रोज सेवन करावे. यामुळे आतड्यांमध्ये साचलेला मल पुढे ढकलण्यास मदत होते व पोट रोजच्या रोज साफ होते.

६) लघवी होताना जळजळ होत असेल तर काकडीचा रस, लिंबुरस, जिरेपूड व खडीसाखर घालून प्या. यामुळे हि जळजळ दूर होते.

७) आम्लपित्त, गॅसेस व आंत्रव्रण (अल्सर) यांसारखे विकार असतील, तर काकडीचा कीस किंवा काकडीचा रस दर २ ते ४ तासांनी प्यावा. यामुळे पोटातील उष्णता कमी होते आणि पोटात थंडावा निर्माण होतो.

८) काकडी, गाजर, बीट व कोथिंबीर यांचा रस एकत्र करून प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते. यामुळे उत्साह निर्माण होतो. शिवाय शरीरात युरिक अ‍ॅसिड साठून होणारे गाऊट, आर्थोरायटिस व सांधेदुखी यांसारखे रोग दूर होतात.

९) अपचन होऊन उलट्या होण्याची समस्या जाणवत असेल, तर काकडीचे बी वाटून ताकामधून घ्यावे. यामुळे पित्त, दाह, वारंवार तहान लागणे हे सर्व विकार काही वेळातच कमी होतात.

१०) चेहऱ्यावर वांग किंवा काळपटपणा असेल, तर तो दूर करण्यासाठी काकडीचा रस, लिंबुरस व दूध एकत्र करून कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावावे व हलक्या हाताने मसाज करावा. शिवाय डोळ्याभोवतालची काळी वर्तुळे घालवण्यासाठी काकडी आणि बटाटे कुस्करून एकत्र करून डोळ्यांभोवती दररोज लावावा आणि सुकल्यानंतर तो धुऊन टाकावा.

१२) काकडीचा कीस चेहरा, मान यावर नियमितपणे लावल्यास चेहऱ्यावरील मुरुमे, पुटकुळ्या, सुरुकुत्या दूर होऊन चेहरा कांतिमान होतो. तसेच हा रस केसांना लावल्यास त्यामध्ये असणाऱ्या सिलिकॉन व गंधकामुळे केस गळायचे थांबतात.

  • लक्षात ठेवा :- काकडीचा गुणधर्म शीत अर्थात तहान आहे. त्यामुळे काकडी पावसाळी आणि हिवाळी ऋतूत अधिक खाऊ नये आणि जर का तुम्ही काकडी खाण्यास इच्छुकच असाल, तर थोड्या प्रमाणात व फ्रिजमध्ये न ठेवलेली सामान्य तापमानाची काकडी खावी.