| |

बहुगुणी जिरा पाणी ठरू शकते आजारपणाचे कारण; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकालच्या धावत्या आणि धगधगत्या जीवनशैलीत आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला फार कमी वेळ मिळतो. यामुळे आपण काही अश्या घरगुती उपायांचा हात पकडतो जे खरोखरंच आपल्याला आरोग्य प्रदान करण्यास सक्षम असतात. यात जिऱ्याचे पाणी हा उपाय सर्वोत्तम उपयांपैकी एक म्हणून मानला जातो. अगदी वजन कमी करण्यापासून, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे आणि मूत्रपिंड व यकृताशी संबंधीत समस्यांवर प्रभावीरीत्या कार्य करणे हि सर्व कामे जिऱ्याचे पाणी करण्यास सक्षम आहे. म्हणून आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिरा पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

पण मित्रांनो जिरा पाणी कितीही आरोग्यदायक असले तरीही ते नुकसानकारक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जर जिऱ्याचे पाणी जास्त प्रमाणात सेवन केले गेले तर आजारपण पाठी लागते. म्हणून काळजी घेणं गरजेचे आहे. काही आरोग्यविषयक समस्या तुम्हाला आधीपासूनच असतील तर जिऱ्याचे पाणी एकतर पिणे टाळा किंवा त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवा. जाणून घ्या जिरा पाणी सेवन करण्याचे प्रमाण चुकले तर होणारे परिणाम खालीलप्रमाणे:-

१) मळमळ आणि मेंदूसंबंधित समस्या – जिऱ्याच्या पाण्यात अंमली पदार्थ आढळतात. यामुळे जिऱ्याचे पाणी जास्त प्रमाणात सेवन केल्याने मळमळ होऊ शकते. परिणामी अस्वस्थता आणि बैचेनीमुळे मेंदूशी संबंधित समस्या उद्भवतात.

२) रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होते- रक्तातील साखर कमी करण्यासाठी जिऱ्याचे पाणी पिण्याचा सल्ला देतात. मात्र तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात असेल तर ते मर्यादित प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. शिवाय जास्त प्रमाणात जिरा पाणी प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होते. परिणामी अशक्तपणा आणि चक्कर येते.

३) पचनक्रियेच्या समस्या – जिऱ्याचे पाणी जास्त प्यायल्याने पचनसंबंधित त्रास होतो. म्हणून जिरा पाण्याचे मर्यादित प्रमाणात सेवन करा. अनेकदा या पाण्यामुळे पोटात गॅस तयार होतो. परिणामी छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवते.

४) मूत्रपिंड आणि यकृतावर दुष्परिणाम – जिऱ्याचे पाणी जास्त प्यायल्याने मूत्रपिंड आणि यकृतावर याचा दुष्परिणाम दिसून येतो. तसेच जर तुम्हाला संबंधित अवयवांशी निगडित कोणताही त्रास आधीपासूनच असेल तर जिऱ्याचे पाणी पिणे टाळणे योग्य राहील.

५) गर्भपाताचा धोका – गरोदर महिलांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय जिऱ्याचे पाणी पिऊ नये. कारण जिऱ्याचे पाणी जास्त प्यायल्यास गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो. कारण या पाण्याचा प्रभाव गरम आहे. परिणामी या उष्णतेमुळे गर्भपात होतो.

६) स्तनदा मातांसाठी नुकसानकारक – स्तनपान करणाऱ्या महिलांनी जिऱ्याचे पाणी जास्त प्रमाणात सेवन करू नये. याचा परिणाम म्हणजे, स्तनदा मातांमध्ये दुधाची कमतरता निर्माण होते. याचा परिणाम त्यांच्या बळावर होऊ शकतो.

७) मासिक पाळीत रक्तस्राव वाढतो – महिलांनी चुकूनही मासिक पाळीदरम्यान जिऱ्याचा पाण्याचे सेवन करू नये. कारण जिऱ्याचे पाणी गुणधर्माने उष्ण असल्यामुळे याचा त्रास होतो. मासिक पाळीदरम्यान जिरा पाणी प्यायल्याने अधिक रक्तस्राव होतो आणि अशक्तपणा येतो.