| |

‘फॅटी लिव्हर’च्या समस्येवर कढीपत्ता देतो गुणकारी लाभ; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या शरीरात चरबी जमा होणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु जेव्हा याची मात्रा जास्त असते तेव्हा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आपण सेवन करीत असलेले अनेक अन्नपदार्थ आणि रासायनिक पेय यामुळे मोठ्या प्रमाणात शरीरात चरबी जमा होते. हि चरबी आपल्या यकृतावर वाईट परिणाम करते. यामुळे यकृताला सूज येते आणि बहुतेकदा ते खराबदेखील होऊ शकते. यालाच ‘फॅटी लिव्हर’ची समस्या म्हणतात. यकृत आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे यकृताची हानी अर्थात आरोग्याचे नुकसान. यावर कडीपत्त्याची पाने अतिशय गुणकारी ठरतात असे एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे. चला तर जाणून घेऊयात फॅटी लिव्हरची लक्षणे आणि आरोग्यदायी कडीपत्त्याचे फायदे खालीलप्रमाणे:-

– फॅटी लिव्हरमध्ये अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असे दोन प्रकार आहेत. हा आजार सामान्यतः चुकीच्या जीवनशैलीमुळे होतो. पण जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल केले तर फॅटी लिव्हरच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

० लक्षणे
– शारीरिक थकवा
– अस्वस्थतेची भावना
– खाण्याची इच्छा मरणे
– पोटात सूज येणे
– पोटदुखी

० फॅटी लिव्हरवर कडीपत्त्याचे गुणकारी लाभ

१) आपल्या रोजच्या जेवणात फोडणीत वापरला जाणारा कडीपत्ता फॅटी लिव्हरवर गुणकारी ठरतो. कारण कडीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. यासाठी कमजोर लिव्हर असणाऱ्या व्यक्तींना कडीपत्ता फायदेशीर ठरतो. यासाठी कडीपत्त्याचा रस वा पानांचे सेवन करावे.

२) कडीपत्त्यामध्ये एंटीऑक्सीडंट आणि एंटी फंगल तसेच, एंटी-बॅक्टेरीयल गुणांचा समावेश असतो. हे सर्व गुण फॅटी लिव्हरपासून सुटका मिळवण्यास मदत करतात.

३) कडीपत्त्यातील इतर पोषक घटक फॅटी लिव्हरशी संबंधित असलेल्या सर्व समस्या दूर करण्यात मदत करतात.

४) शिवाय फॅटी लिव्हर असलेल्या रुग्णांनी कडीपत्त्याच्या रसासोबत लिंबू वर्गीय फळे खावी.

५) फॅटी लिव्हरची समस्या असणाऱ्या रुग्णांनी एवोकॅडोसोबत कडीपत्त्याचा रस आणि अक्रोड खाल्ल्यास यकृतामध्ये जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.