Custard apple seeds have the power to boost the immune system
|

सीताफळांच्या बियांमध्ये आहे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची ताकद

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  सीताफळामध्ये काही पोष्टक घटक असतात. ते शरीराच्या दृष्टीने फार महत्वाचे असते. त्याच्यामध्ये असलेले सगळे पदार्थ हे आपल्या शरीराला पोषक असतात. सीताफळामध्ये असलेला गर हा आपल्या आरोग्याला फार लाभकारी आहे. सीताफळामध्ये असलेले नैसर्गिक जीवनस्त्वव अनेक आजारांवर विशेष फायदेशीर आहे. सीताफळामध्ये असलेला गर हा तर फायदेशीर आहेच तसेच त्याच्या बिया सुद्धा आपल्या गुणधर्मामुळे अनेक आजारांवर उपाय म्हणून वापरले जाते.

—- सीताफळामध्ये कॅलशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि इतर अनेक पोषक द्रव्ये असतात. त्याने आपल्या शरीराला ताकद मिळते.

— सीताफळामध्ये व्हिटामिन बी-6चं प्रमाणात जास्त असतं. त्यामुळे अस्थमाचा त्रास रोखण्यात मदत होते.

— हृदयाचे त्रास असणाऱ्यांनी सीताफळ नियमित खावे. हृदयाच्या सगळ्या आजारांवर सीताफळ हे अतिशय फायदेशीर आहे.

— सीताफळामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि रिबोफ्लेविन हे पदार्थ असतात. त्याने दृष्टिदोष कमी होण्यास मदत होते.

— सीताफळामध्ये तांबे-लोहं असल्यामुळे त्याचा गर्भवती महिलांसाठी देखील खूप फायदा आहे. त्याच्या आहारामुळे गर्भधारणेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होतात.ताफळामध्ये

— नियमित सीताफळ खाल्याने पचनक्रिया सुधारते. शरीरात रक्ताची योग्य पातळी राखण्यास मदत होते.

— कमी रक्तदाब आणि मधुमेह रूग्णांसाठी सीताफळ खूप फायदेशीर आहे.

— शरीरात अशक्तपणा आला असेल किंवा काम करताना थकवा जाणवत असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शक्ती निर्माण होते.

— अतिसार झाला असेल तर सीताफळाचा रस फायदेशीर असतो.

— छातीत, पोटात जळजळ जाणवत असेल तर सीताफळ खाल्ल्यानं आराम पडतो.

—– लहान मुलांच्या वाढीसाठीही सीताफळ अधिक फायदेशीर आहे.