Bay Leaf
| | |

रोजच्या वापरातील तमालपत्र देऊ शकते सौन्दर्य आणि निरोगी आरोग्य; कसे ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जेवणात वापरल्या जाणाऱ्या खड्या मसाल्यातील एक पदार्थ म्हणजे तमालपत्र. पण तमालपत्रांचा वापर केवळ तेवढ्यापुरता मर्यादित नसून त्याचा आरोग्यासाठी देखील अतिशय फायदा आहे. नवल वाटत असलं तरी हेच सत्य आहे. तमालपत्रात कॉपर, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि आयर्न मुबलक प्रमाणात आढळतात. यामध्ये बरेच अँटी ऑक्सीडेंट असतात जे कर्करोग, रक्ताच्या गुठळ्या होणे आणि हृदयाच्या अनेक गंभीर आजारापासून संरक्षण करतात. तमालपत्राचा वापर आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. तर मग चला जाणून घेऊयात तमालपत्राच्या अमूल्य गुणांबद्दल आणि त्याचा दैनंदिन जीवनातील वापर.

तमालपत्राची पाने चेहऱ्यावर डाग, खड्डे किंवा मुरुम असल्यास खूपच फायदेशीर आहेत. तमालपत्रांची पेस्ट किंवा तमालपत्र घालून उकळलेल्या पाण्याने चेहरा स्वच्छ केला असता चेहऱ्यावरील धूळ निघून जाते. सोबत चेहरा डाग रहितसुद्धा होतो. तसेच तमालपत्राच्या पानाचे पाणी सूर्यकिरणांमुळे प्रभावित झालेली त्वचा अर्थात डेड स्किन टोन बरे करण्यास मदत करते. शिवाय त्वचेचा मूळ रंग राखण्यास मदत करते.

केसांना मऊ आणि चमकदार ठेवण्यासाठीदेखील तमालपत्र अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी आहे. एखादे तमालपत्र तेलात मिसळून हे तेल केसांच्या मुळात लावल्याने केसांची मूळ मजबूत होतात. शिवाय तमालपत्राचा पाण्याने केस धुतल्याने केसांना चमक येते. तसेच तमालपत्राची पेस्ट करून ती दह्यात मिसळून केसांना लावल्याने कोंड्याच्या त्रासापासून मुक्तता मिळते.

तसेच तमालपत्राची पाने वाळवून त्याची भुकटी दंतमंजन म्हणून वापरल्याने दातांची चमक कायम राहते व पिवळे दात पांढरे होण्यास मदत होते. शिवाय कंबरदुखीचा त्रास असल्यास याचा तमालपत्राचा काढा करून प्यावा. यामुळे कंबरदुखीपासून त्वरित आराम मिळतो. अथवा आपण तमालपत्राच्या तेलाने मॉलिश करून देखील कंबरदुखीवर आराम मिळवू शकता. तसेच तमालपत्राचा काढा थंडीमुळे आखडणारे स्नायू मोकळे करण्यासाठी आणि शारीरिक वेदनेपासून आराम मिळ्वण्यासाठीदेखील उपयुक्त आहे.

याकरता १० ग्रॅम तमालपत्र, १० ग्रॅम ओवा आणि ५ ग्रॅम कच्ची बडीशेप एकत्र करून वाटून घ्या. हे मिश्रण पूर्ण १ लिटर पाणी घालून चांगल्या प्रकारे उकळवून घ्या. हे पाणी अर्ध्याहून अर्धे झाल्यानंतर थंड करून घ्या. तुमचा आरोग्यवर्धक तमालपत्राचा काढा पिण्यासाठी तयार. तमालपत्राचा हा काढा शरीरात कुठेही चमक भरल्यास किंवा स्नायूंना सूज येऊन वेदना होत असल्यास कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. तसेच तमालपत्र वाटून त्याची पेस्ट बनवून होत असलेल्या वेदनेच्या जागी लावल्यास त्वरित आराम मिळतो.