|

बॉडी स्प्रेचा दैनंदिन वापर त्वचेच्या आरोग्यासाठी हानीकारक; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दैनंदिन धावपळीत शरीरातून घामाचे उत्सर्जन होणे साहजिक आहे. मात्र या घामाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी अनेकजण दररोज बॉडी स्प्रेचा वापर करतात. कित्येकजण तर बॉडी स्प्रे थेट शरीराच्या त्वचेवर स्प्रे करतात. पण तुम्हाला हे माहित आहे का, की बॉडी स्प्रे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असतात. तुमचा विश्वास बसत नसेल तर लगेच जाणून घ्या कि बॉडी स्प्रेचा दैनंदिन वापर त्वचेला कशी हानी पोहचवू शकतो. खालीलप्रमाणे:-

१) बॉडी स्प्रेचा थेट त्वचेवर नियमित वापर केल्याने आपल्या त्वचेवर लाल पुरळ उठते आणि खाजेऱ्या सारख्या समस्या निर्माण होतात. यामुळे स्किन एलर्जी देखील होते.

२) बॉडी स्प्रेच्या तीव्र वासामुळे श्वास घेण्यास समस्या होऊ शकते.

३) बॉडी स्प्रे घामाचा वास कमी करतो मात्र त्याचा दररोज वापर केल्यास घाम येण्याची प्रक्रिया प्रभावित होते आणि घामाचा वास अधिक घाण येतो.

४) बॉडी स्प्रेच्या अति वापराने काखेतील त्वचा काली कुट्ट होते शिवाय त्वचेवर पुळ्या येतात.

५) तज्ञांच्या मते शरीरातून घाम निघून जाणे आरोग्यासाठी गरजेचे आहे. यामुळे शरीर डिटॉक्सिफाई होण्यास मदत होते आणि ते नैसर्गिकरित्या थंड राहते. परंतु बॉडी स्प्रेमुळे शरीरातील ग्रंथी कमकुवत होऊन आजारांची संख्या बळावते.

लक्षात ठेवा :
– बॉडी स्प्रे वापरताना हे थेट त्वचेवर न लावता कपड्यांवर स्प्रे करा. याने त्वचेला हानी होणार नाही.
– दागिने घालण्यापूर्वी परफ्युम किंवा बॉडी स्प्रे करून घ्या. अन्यथा दागिन्यांच्या चमकेवर परिणाम होतो.