| |

मैत्रिणींनो, अंगावरून पांढर जात असेल तर मुळीच दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या कारणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सगळ्यांसाठी मरमर राबणारी आणि त्यातूनही ऑफिसचे काम सांभाळणारी गृहिणी अनेकदा कुटुंबापुढे आपले आरोग्य विसरून जाते. त्यामुळे स्त्रिया आपल्या आरोग्याच्या लहान वाटणाऱ्या कुरबुरींकडे तर दुर्लक्ष करतातच. याशिवाय मोठ्या आणि गंभीर आजारांकडेही कानाडोळा करताना विचार करत नाहीत. परिणामी पुढे भविष्यात त्यांना मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागते. यांपैकी अशीच एक गंभीर बाब म्हणजे श्वेतपदर.. यालाच मराठीमध्ये अगदी सोप्प्या भाषेत अंगावरुन पांढरे जाणे असे म्हणतात. खूप महिलांना अंगावरून पांढरे जाण्याचा त्रास असतो. पण याकडे महिला दुर्लक्ष करतात.

मैत्रिणींनो अंगावरुन पांढरे जाणे हे मासिक पाळीदरम्यान होत असेल तर सामान्य बाब आहे. मात्र हे सतत होत असेल तर ही धोक्याची घंटा असू शकते. यामुळे श्वेतपदराची ही समस्या तुम्हाला होत असेल तर यामागील कारणे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊयात यामागील कारणे आणि मोलाचे सल्ले खालीलप्रमाणे:-

१) मानसिक तणाव – ऑफिसचे काम, घरगुती गोष्टी, पैश्याची चणचण, मुलांचे भविष्य, अति विचार आणि तब्येतीच्या दिसणाऱ्या तक्रारी यांमुळे महिला प्रचंड तणावाखाली असतात. त्यामुळे वाढत ताण-तणाव त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतो. यामुळे श्वेतपदर जाण्याचा त्रास होण्याची शक्यता असते.

२) योनी मार्गातील इन्फेक्शन – अनेकदा स्त्रियांना योनी मार्गात इन्फेक्शन झाल्याचे समजून येत नाही. अशावेळी जर तुमच्या अंगावरुन पांढरे जात असेल तर तुमच्या योनी मार्गाला इन्फेक्शन झाले असण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्याही अंगावरुन जास्त पांढरे जात असेल तर लवकरात लवकर तपासणी करून घ्या.

३) गर्भाशयाला सूज – अंगावरुन पांढरे जाण्याची समस्या सर्वसदाहरण नसून गंभीर आहे समजून घ्या. यामागे गर्भाशयाला आलेली सूज देखील कारणीभूत असू शकते. म्हणून सतत पांढरे जात असेल तर वेळीच तपासणी करा. यामुळे अंडाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.

४) मधुमेह – मधुमेहामुळे शरीरात अनेक बदल होत असतात. मधुमेहामुळे जंतुदोष होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा परिस्थितीतदेखील स्त्रियांना अंगावरुन पांढरे जाण्याची शक्यता असते.

५) स्त्री बीज पाझर – महिलांमध्ये संबंध ठेवण्याची भावना उत्पन्न झाल्यास स्त्री बीजाला पाझर सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे अशावेळी योनीतुन पांढरा स्राव होणे स्वाभाविक आहे. यात चिंता करण्याचे कारण नाही.

० मोलाचे सल्ले –

१) जर तुम्हाला अगदी हलकासा स्त्राव होत असेल तर ठीक आहे. मात्र याचे प्रमाण आणि स्वरुप बदलले तर त्वरित डॉक्टरांकडे जा आणि तपासणी करून घ्या.

२) अंगावरुन जाणारे पांढरे खूप जड आणि पिवळ्या रंगाचे असेल याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

३) अंगावरून जाणाऱ्या पांढऱ्या स्त्रावाला जर खूप घाण वास येत असेल तर तुम्ही त्वरीत डॉक्टर गाठा. कारण हे लक्षण आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे.

४) अंगावरून पांढरे जाताना जर तुम्हाला सतत ताप येणे, कंबर दुखणे आणि पोट दुखणे अश्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही मोठ्या समस्येतून जात आहेत त्यामुळे वेळीच तपासणी आणि औषधोपचार आवश्यक आहे हे समजून घ्या.

५) वरीलपैकी कोणताही बदल तुम्हालासुद्धा जाणवत असेल तर आताच सावध व्हा आणि स्वतःची काळजी घ्या.