how to develop personal development ?

अशा, सवयी सोडून व्यक्तिमत्व करा विकसित

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  आपल्या व्यक्तिमत्वात बदल करायचे असतील तर आपल्याला आपल्या काही चांगल्या आणि वाईट सवयी या बदलल्या गेल्या पाहिजेत. आपल्या चांगल्या सवयी या आपल्या बरोबर सदोदित आपल्या सोबत असल्या पाहिजे. पण वाईट सवयी या मात्र आपल्याला बदलल्या गेल्या पाहिजेत. पण मनुष्य असा प्राणी आहे कि , वाईट सवयी लवकर लागतात. वाईट सवयी मात्र लवकर जात नाहीत. वाईट सवयी या दूर करण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे तुम्ही वाईट सवयी जडल्या जाऊ नयेत याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.

—- आपल्या योग्यतेवर संशय घेऊ नका

अनेक वेळा आपण एखादे काम करायला सुरुवात करतो. तेव्हा आपल्याला आपल्या कामावर सुद्धा अनेक वेळा संशय निर्माण हा होतो. बऱ्याच वेळा असे घडते की जेव्हा कोणी काही नकारात्मक बोलल्यावर आपण संशयाने वेढलेले असतो पण या परिस्थितीत आपण दुसऱ्यांच्या सांगण्यात न येता स्वतःवर अविश्वास करू नका. आपल्या कामावर विश्वास निर्माण करा. किंवा आपल्या कामावर जास्त लक्ष द्या . आपल्यापेक्षा कुणीही आपल्याला ओळखू शकत नाही. म्हणून आपल्या मनाला कुठे ही न भटकवता आपल्या क्षमतेनुसार काम करा.

—– कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती करू नका

एखादी गोष्ट हि आपल्याला जमत नसेल किंवा अनेक वेळा तीच गोष्ट पुन्हा पुन्हा चुकीची घडत असेल तर मात्र आपण माघारी फिरलो पाहिजे. आणि आपण आपल्या ध्येयापासून दूर अजिबात गेले नाही पाहिजे.

— अति भावनिक होणं टाळा

कधी कधी माणूस भावनेच्या आहारी जातो आणि त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी त्यांना मिळत नाहीत. त्यामुळे प्रत्येक वेळेला भावनेच्या आहारी न जाता अजिबात काम करू नये. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भावनिक अजिबात होऊ नये.