Diabetes and swelling of the feet

मधुमेह आणि पायाला येत असलेली सूज

हॅलो आरोग्य  ऑनलाईन । आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोक आहेत कि त्यांना मधुमेह यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. भारतात मधुमेह हा आजार असणाऱ्या लोकांचे प्रमाण हे जास्त आहे. मधुमेहाची लक्षण दिसायला सुरुवात झाली कि लगेच त्यावर इलाज करणे आवश्यक आहे. मधुमेह हा आजार आजकाल कोणत्याही वयातही लोकांना होऊ लागला आहे. मधुमेह या आजारासोबत कोणत्या प्रकारच्या इतर समस्या या निर्माण होऊ लागल्या आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात …

मधुमेहींना हृदयविकार आणि पायांची सूज यासारख्या अनेक गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते. काही रुग्णांमध्ये मधुमेहामुळे पेरिफेरल इडिमा हा त्रास आढळतो आणि तो वेदनादायक असतो.मधुमेहाच्या बर्‍याच रुग्णांना पायांना सूज येत असल्याचा त्रास जाणवतो. अतिदबावामुळे रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळे पायातील नसांमध्ये योग्य रक्ताभिसरण होत नसल्याने हा त्रास उद्भवतो. खराब नसांमुळे पेरिफेरल इडिमाचा त्रास उद्भवतो, पेशींभोवती पाणी साठते त्यामुळे सूज येते, पण पायाला सूज येण्याची इतरही अनेक कारणे आहेत.

— पेरिफेरल इडिमा हे मधुमेहामध्ये पायावर सूज येण्याचे मुख्य कारण असू शकते. यामध्ये पायाच्या, घोट्याच्या, पावलाच्या भागामध्ये फ्लुईड साठत असते. त्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर रूप येऊ शकते.

— काही वेळेला मधुमेही व्यक्तीला मधुमेहाशी निगडीत मज्जासंस्थेचा त्रास असू शकतो. त्यामुळे पावले आणि पाय यांच्यामध्ये बधीरपणाही येऊ शकतो. त्याचा परिणाम म्हणजे पायाला जखम झाल्याची वेदना मग ती पाय मुरगळणे असो की, हाड मोडणे यासारख्या गंभीर त्रासाच्या संवेदनाही मधुमेही व्यक्तीला जाणवतात.

— पायाची सूज कमी करण्यासाठी

मधुमेही असल्यामुळे इन्शुलिनची पातळी स्थिर राखण्यासाठी काही औषधे शरीरामध्ये जातच असतात तसेच आपला आहार सुद्धा खूप चांगला आणि पोतयुक्त असला पाहिजे.

— झोपताना पायाखाली उशी घेऊन झोपले जावे. पाय जास्तीत जास्त हृदयाच्या दिशेला वर येतील.

— पायांमध्ये पाणी होण्याचा धोका कमी करण्यासाठी काही नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.

— कमी प्रमाणात मीठ घातलेला आहार सेवन करा.

— एकाच पायावर फार वेळ उभे राहू नका. कामाचे तसे स्वरूप असल्याल मध्ये मध्ये बसा. त्याने आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा ताण हा येणार नाही.

— रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठी पायाला नियमितपणे मसाज करून घ्या. तळव्यापासून या मसाजला सुरुवात करा.

— फार वेळ मांडी घालून बसू नका. त्यामुळे पायाच्या तळव्याकडे होणारे रक्ताभिसरण कमी होते.

— मधुमेही व्यक्तीने धूम्रपान केल्यास पायाला सूज येण्याचा धोका वाढू शकतो. जर धूम्रपान करत असाल तर ते बंद करण्याचा विचार करा.