Diabetes Diet
|

Diabetes Diet । मधुमेह असलेल्या रुग्णांनी आहारात करावा नाचणीचा समावेश; शरीराला होईल मोठा फायदा

Diabetes Diet । मानवी शरीर निरोगी राखण्यासाठी आयुर्वेदिक शास्त्र आणि आहारशास्त्रामध्ये असे अनेक वेगवेगळे पदार्थ सांगण्यात आलेले आहेत. ज्या पदार्थांच्या माध्यमातून आपण आपले आरोग्य अगदी निरोगी राहू शकतो तसेच आपल्या आजूबाजूला अनेक धान्य उपलब्ध असतात. या धान्यांबद्दल अनेकांना फारशी माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला आहारशास्त्रामध्ये महत्त्वपूर्ण मानले गेलेल्या पदार्थांबद्दल सांगणार आहोत. हा पदार्थ जर व्यक्तीने नियमितपणे सेवन केला तर तुमच्या शरीरातील अनेक आजार दूर होऊ शकतील. हल्ली अनेकांना एक आजार उद्भवताना दिसून येत आहे तो म्हणजे डायबिटीज यालाच आपण मधुमेह देखील म्हणतो. मधुमेहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या आजारांचे लक्षण दिसून येत आहे. हा आजार झाल्यावर व्यक्तीला खूप काळजी घ्यावी लागते. खाण्यापिण्याचे पथ्य पाळावे लागते परंतु औषध उपचार करत असताना जर तुम्ही काही घरगुती उपाय व काही धान्यांचा वापर करून देखील तुमच्या शरीरातील साखरेची मात्रा नियंत्रणात आणू शकता.

दैनंदिन जीवन जगत असताना आपण गहू, ज्वारी, बाजरी यासारखे धान्य सेवन करत असतो परंतु जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये नाचणीचा उपयोग केला तर तुम्हाला खूप सारी ऊर्जा तसेच शरीरासाठी फायदे देखील मिळवू शकता. आहारशास्त्रामध्ये खूपच महत्त्व देण्यात आलेले आहे. हे एक पूर्ण धान्य मानले जाते. नाचणीमध्ये तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याची क्षमता असते म्हणूनच जर आपण नियमितपणे नाचणीपासून बनवलेले पदार्थ सेवन केले तर तुमच्या शरीरातील सगळे विषारी घटक बाहेर पडू शकतात व शरीराला संरक्षण कवच देखील प्राप्त होऊ शकते.

नाचणीमध्ये असतो जीवनसत्वांचा खजिना – Diabetes Diet

नाचणीला सुपर फूड असे म्हटले जाते कारण की या नाचणीमध्ये जीवनसत्वांचा खजिना उपलब्ध असतो. नाचणीमध्ये विटामिन डी, प्रोटीन्स, फॅट, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. हे सारे जीवनसत्व तुमच्या शरीराला बळकटी देण्याचे प्रमाण कर कार्य करतात. ज्या रुग्णांना मधुमेहाचा आजार झालेला आहे अशा व्यक्तींनी जर दिवसभरातून एकदा नाचणीची भाकर व नाचणीची पेज सेवन केली तर तुमच्या शरीरातील सर्व घटक नियंत्रणात राहतील. ब्लडप्रेशर रक्तभिसरण प्रक्रिया साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहील भविष्यात तुम्हाला इन्सुलिनचा वापर करावा लागणार नाही.

कधी करावं नाचणीचे सेवन?

डॉक्टरांच्या मते , नाचणीमध्ये अनेक असे पोषक तत्व असतात, जे तुमच्या शरीराला उपयुक्त ठरतात. परंतु नाचणी सेवन करण्यासोबत योग्य तो व्यायाम करणे देखील गरजेचे आहे अनेक जण सकाळी नाचणी सेवन करतात. ही योग्य वेळ आहे परंतु काही लोक नाचणी रात्री सेवन करतात असे करणे चुकीचे आहे. नाचणी हा पदार्थ पचायला जड असतो, ज्यामुळे तुम्हाला आतड्यासंबंधी समस्या किंवा एलर्जी देखील होऊ शकते. म्हणून शक्यतो नाचणीची पेज किंवा नाचणीची भाकर सकाळी सेवन करायला हवी यामुळे अन्नपचन देखील व्यवस्थित होईल व शरीराला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही.

तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही दुपारच्या वेळी देखील नाचणीची भाकर खाऊ शकता. दुपारी नाचणीची भाकर खाल्ल्याने तुमच्या शरीरातील साखरेची मात्रा नियंत्रणात राहते. तुम्ही नाचणीचे विविध पदार्थ बनवून देखील सेवन करू शकता, त्यामध्ये भाकर, पेज, रोल,डोसा, इडली असे अनेक गोष्टी बनवून खाऊ शकता. जर एक महिनाभर नियमितपणे तुम्ही नाचणीचे सेवन केले तर भविष्यात डायबिटीस कमी होईल (Diabetes Diet) व तुम्हाला परिणाम देखील दिसून येईल.