diabetes patient yoga asanas
|

डायबिटीज मध्ये ‘या’ आसनांचा करा वापर

हॅलो आरोग्य ऑनलाईन । अनेक महिलांना व पुरुषांना मधुमेह याचा त्रास हा उतारत्या वयात जास्त प्रमाणात जास्त असतो. त्यामुळे मधुमेह या आजारावर जास्त काळजी लागते . त्यासाठी अनेक वेगवेगळे प्रकारचे व्यायाम प्रकार आहेत, हे व्यायाम प्रकार करून मधुमेही लोक आपले आरोग्य हे व्यवस्थित ठेवू शकतात. हा आजार सर्वसामान्य झाला आहे. भारतात या आजरातील लोकांची संख्या हि जवळपास २७ टक्के इतकी आहे. या आजाराचे प्रमाण हे जास्त असेल तर त्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. कोणते असे व्यायाम आहेत , कि त्याचा वापर केल्याने मधुमेहाचे प्रमाण हे काही प्रमाणात कमी होऊ शकते ते जाणून घेऊया. Diabetes Patient Yoga Asanas

— कपालभाती प्राणायाम

कपालाभाती प्राणायाम आपल्या मज्जातंतू आणि मेंदूच्या नसाला ऊर्जा प्रदान करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा प्राणायाम खूप चांगला आहे, कारण यामुळे ओटीपोटात स्नायू सक्रिय होतात. हा प्राणायाम रक्त परिसंचरण सुधारतो आणि मनाला शांती देतो.

— सुप्त मत्स्येन्द्रासन

हे आसन शरीराच्या अंतर्गत अवयवांचे मालिश करते आणि पचन क्रिया सुधारण्यास मदत करते . हे आसन ओटीपोटात अवयव सक्रिय करते. Diabetes Patient Yoga Asanas

— धनुरासन

हे आसन स्वादुपिंड सक्रिय करते आणि मधुमेहाच्या रुग्णांना अत्यधिक फायदेशीर ठरतो. या योगासनाने ओटीपोटात अवयव बळकट होतात आणि पोटावरील तणाव कमी होतो. त्यामुळे पचन क्रिया सुद्धा सुरळीत होण्यास मदत होऊ शकते.

— पश्चिमोत्तानासन

हे आसन पोट आणि पेल्विक अवयवांना सक्रिय करते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. तसेच शरीरात उर्जा वाढवते आणि मनाला शांती देते.

— अर्धमत्स्येद्रासन

हे आसन ओटीपोटाच्या अवयवांचा मालिश करते आणि फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढवते. तसेच मणक्याला बळकट करते. हे योगासन केल्याने मन शांत होते, व पाठीच्या मक्यास सुरळीत रक्त पुरवठा होतो.

— शवासन

शवासन संपूर्ण शरीर आराम देते. हे आसन एखाद्या व्यक्तीला खोल मन: स्थितीत घेऊन जाते, जेणेकरून मन शांत आणि नवीन उर्जेने परिपूर्ण होते.

— सेतुबंधासन

मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ही आसन खूप फायदेशीर आहे. हे केवळ ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवत नाही तर मनाला शांतता व विश्रांती देते. नियमित केल्याने पाचन तंत्र ठीक होते मान आणि मणक्याचे ताणण्याबरोबरच स्त्रिया मध्ये मासिकपाळीत आराम देते.

— हलासन

हे आसन दीर्घकाळ बसून काम करणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर आहे. हे घशातील, फुफ्फुसातील आणि इतर अवयवांच्या ग्रंथीला उत्तेजित करते, ज्यामुळे संपूर्ण शरीरात रक्ताचा संचार होतो.