|

मधुमेहींनो, दिवाळीमध्ये गोडधोड खा पण आरोग्यही जपा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सण म्हटलं का मग मिठाई आलीच. त्यात जर हा सण दिवाळीचा असेल तर मग काय चंगळच. खूप मिठाई, खुसखुशीत फराळ त्यात खमंग चकल्या आणि बेसन, रवा, बुंदीचे लाडू. यामुळे अनेकदा दिवाळीत वजनही वाढत आणि अंग सुस्तावून जातं. यानंतर दिवाळीची सुट्टी संपली का मग ऑफिसमध्ये जायची इच्छाच होत नाही. त्यात काम करायचं म्हटलं तर आणखीच नकोसे वाटते. पण या सणांच्या दिवसात सगळ्यात जास्त काळजी करावी लागते ती मधुमेहनाई ग्रासलेल्या रुग्णांची. कारण सणाच्या नावावर हवी तितकी मिठाई खायची आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करायचे हे ठरलेलं असतं. सणाच्या काळात हे लोक आरोग्याची अजिबात काळजी घेत नाहीत. त्यात दिवाळीदरम्यान हिवाळा सुरु असतो. हिवाळ्यात आपली पचनक्रिया देखील शमलेली असते. यामुळे सणासुदीच्या काळात एखाद्या आजाराने ग्रासलेल्या लोकांनी स्वतःची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया मधुमेहाच्या रुग्णांनी या दिवसात स्वतःची काळजी कशी घ्यावी ते खालीलप्रमाणे:-

० दिवाळीच्या दिवसात ब्लड शुगर करा कंट्रोल:- जाणून घ्या टिप्स खालीलप्रमाणे

१) सणापूर्वी रक्तातील ग्लुकोज लेव्हल आवश्य तपासा. बॉडी स्क्रीनिंगमुळे संभाव्या जोखमीची माहिती मिळेल. यानंतर सावधगिरीने सण साजरा करीत आनंद घ्या.

२) शक्य तितके मनाला आणि जिभेला आवरा. गोड पदार्थांपासून दूर रहा आणि तळलेले पदार्थ टाळा.

३) कितीही मनात आलं कि आज बाहेरचं खाऊया तरीही घरचेच जेवण खा. रिफाईंड शुगर आणि सॅच्युरेटेड फॅटयुक्त पदार्थ खाऊ नका.

४) मधुमेहींनी डॉक्टरांना ओरल अँटी डायबिटिक मेडिकेशन्स आणि इन्सुलिन संबंधी काहीही अडचण जाणवल्यास विचारा आणि निरसन करून घ्या.

५) दिवाळीत गोड पदार्थ टाळून त्याऐवजी गुळ, खजूर किंवा अंजीर सारखा पर्याय निवडा.

६) शक्य झाल्यास नैसर्गिक मधुरयुक्त फळे किंवा ड्राय फ्रूट्सचे सेवन करा.

७) सण आहे म्हणून व्यायाम करणे टाळू नका.

८) रोजचे दैनंदिन रूटीन बदलू नका.

९) फटक्यांच्या धुरापासून लांब रहा.