| |

आपणांस माहित आहेत का? खजूर आणि दूध एकत्र घेण्याचे ‘हे’ फायदे; जाणून थक्क व्हाल!!!

हॅलो आरोग्य ऑनलाईन :  उपवास असल्यावर हमखास घरात दिसणारा पदार्थ म्हणजे खजूर. कारण शरीराला आवश्यक ऊर्जा थोड्या खजुराने देखील प्राप्त होते. त्यामुळेच खजुराला पूर्ण आहार म्हटले जाते. खजूर हे अंत्यत पौष्टिक खाद्य आहे. खजूर खाल्याने अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. यामुळे शरीराला ताकद मिळते तसेच  शरिराचा लवकर विकास होतो. जास्त शुगर क्रेव्हिंग त्यांच्यासाठीही खजूर उत्तम पर्याय ठरू शकतो. खारिक म्हणजेच सुकलेले खजुर. खारिक ही ब-याच ठिकाणी पदार्थाला गोडी यावी यासाठीही वापराता कारण त्यात नैसर्गिक गोडी असते…. आपल्याकडे फक्त स्त्रीयांसाठी खारिक चांगली तेही गरोदर स्त्रीयांसाठी जास्त चांगली असाच समज आहे पण पुरूषांसाठीही तितकीच लाभदायक आहे. चला तर मग आपण आज त्याचे फायदेच जाणुन घेऊ.. खास करुन दूधातुन खाल्ल्यावर काय होते हे पाहु.

 • खारिक आणि दूध दोन्हीही ताकदीसाठी चांगले असतात… दूध नुसते पिणे काही जणांना नको वाटते मग त्यात साखरे ऐवजी खारिक घातली तर नैसर्गिक गोडवा येतो व साखरेचा वापर कमी होतो जे की आरोग्यासाठी चांगलेच आहे. कारण खारकेमध्ये मेग्नेशिअम असते ते शरिरातील साखर नियंत्रणात मोठे काम करतात.
 • सर्दी, पडसे, खोकल्यामुळे त्रास होत असल्यास ग्लासभर दूधात पाच खारीक, पाच काळामिरीचे दाणे, वेलचीचे तुकडे एकत्र करून उकळावेत. या मिश्रणामध्ये चमचाभर तूप मिसळा. हे ड्रिंक सायनसच्या रूग्णांदेखील फायदेशीर ठरते.
 • अनेकजण दूधामध्ये खारीक पावडर मिसळून पितात. यामुळे अनेक आजारांपासून तुमचे संरक्षण होते. दूधात खारीक भिजवून खाणे आबालवृद्धांसाठी एनर्जी ड्रिंकप्रमाणे काम करते.
 • नियमित 2-3 खारीक दूधात उकळून प्यायल्यास वीर्यनिर्मितीस चालना मिळते.
 • खारीकातील मॅग्नेशियम घटक शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
 • मधूमेहींसाठी खारीक गुणकारी ठरते. त्यामधील नैसर्गिक गोडवा रक्तातील साखरेमध्ये अचानक होणारे बदल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
 • सर्दी, पडसे, खोकल्यामुळे त्रास होत असल्यास ग्लासभर दूधात पाच खारीक, पाच काळामिरीचे दाणे, वेलचीचे तुकडे एकत्र करून उकळावेत. या मिश्रणामध्ये चमचाभर तूप मिसळा. हे ड्रिंक सायनसच्या रूग्णांदेखील फायदेशीर ठरते.
 • बद्धकोष्ठतेचा त्रास असणार्यांनाही खारीक फायदेशीर ठरते. यामध्ये पोटॅशियम घटक मुबलक असतात. दूधामध्ये खारीक मिसळून प्यायल्याने त्यामधील फायबर घटक पचनक्रियेला चालना देतात. त्यामुळे नियमित दूध – खारीकाचे मिश्रण एकत्र करून प्यावे.
 • पचनाचा त्रास, डायरिया, पोटदुखी अशा समस्यांवर खारीक आणि दूध फायदेशीर आहे. खारीकातील पोटॅशियम, कॅल्शियम, कॉपर, मिनरल्स, मॅगनीज, सेलेनियम असे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. हाडांना बळकटी देण्यासाठी खारीक आणि दूध फायदेशीर आहे. खारीकमधील फायबर घटक कोलोन कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात.
 • खारीकमध्ये व्हिटॅमिन ए, बी १, बी२, बी ३,बी ५ आणि विटॅमिन सी असते. यामुळे त्वचेला चकाकी येण्यास मदत होते. सोबतच शरीरात नव्या पेशींची निर्मिती होण्यास मदत होते. खारीकमध्ये नैसर्गिक स्वरूपातील साखर असल्याने गोडवा मिळवण्यासाठी तो एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
 • खजूर खाल्ल्याने ऊर्जा मिळते. तसेच थकवा दूर होतो. खजूर खाल्ल्यानंतर काही दिवसांतच फायदा व्हायला लागतो. अनेक आजार खजूर खाल्याने आपण टाळू शकतो.
 • पचनक्रिया चांगली राहते- नेहमीच पोट फुगण्याचा किंवा अपचनाची समस्या असणार्यांसाठी खजूर खाणे खुप उपयोगाचे आहे. खजूर खाल्ल्यास अनेक समस्या दूर होतात. वस्तुत: खजुरातील फायबरमुळे पचनक्रिया चांगली राहते. २-३ खजूर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे त्यांची पचनक्रिया चांगली राहते आणि त्यांना पोषणदेखील मिळते.
 • रक्त वाढण्यास मदत- अॅनिमिया झाल्यास डॉक्टर खजूर खाण्याचा सल्ला देतात. याने शरीराला पुरेसे लोह मिळते. ज्या मुलांना अॅनिमिया आहे त्यांच्यासाठी खजूर फायद्याचे आहेत. तुमच्या मुलाच्या छातीत दुखत असेल खजूराने फायदा होईल.
 • मज्जासंस्थेला बळकटी- खजुरामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. सोबतच यामध्ये सोडियमदेखील आढळते. ही दोन्ही पोषक द्रव्ये मज्जासंस्था योग्य पद्धतीने काम करण्यात मदत करतात. यामुळे मेंदूचा विकास होतो.

सकाळी उपाशीपोटी जर चहाऐवजी जर दूध आणि खजूर चा समावेश  केला तर स्नायूंची झीज लवकर भरून निघते.  शिवाय चहाला एक नैसर्गिक पर्याय पण मिळू शकतो.