| | |

वजन वाढवणे कठीण झाले? मग ‘हे’ पदार्थ जरूर खा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन| ज्याप्रमाणे वजन कमी करणे हे जाड व्यक्तींसाठी मोठे आव्हान असते. अगदी तसेच वजन वाढवणे पातळ लोकांसाठी मोठे आव्हानच असते. ज्या लोकांचे वजन गरजेपेक्षा थोडे नाही नाही थोडे जास्तच कमी आहे, अशा लोकांची फार चेष्टा केली जाते. अगदी कुपोषित, गरिबीचा प्रभाव, सुकड्या, लाठी असे विविध लेबल आणि टॅग देखील त्यांना दिले जातात. त्यामुळे जर आपणही कमी वजनामुळे त्रस्त असाल तर खाली सांगितलेले पदार्थ तुम्हाला वजन वाढवायला मदत करतील. चला तर जाणून घेऊयात कोणकोणते पदार्थ तुमचे वजन वाढवायला मदत करतील.

१) अंडी – अंडी चरबी आणि कॅलरीने समृद्ध असतात. त्यामुळे दररोज उकडलेले अंड खाणे शरीर मजबूत करतात आणि आपोआप आपले वजनही वाढते.

२) केळी आणि दूध – वजन वाढवण्यासाठी दूध आणि केळी अगदी फायदेशीर ठरतात. केळीमध्ये भरपूर कॅलरी असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. मात्र उर्जेसोबत आपले वजन वाढण्यासही ते उपयोगी ठरते. शिवाय दुधात भरपूर कॅल्शियम आरे ज्यामुळे शरीर मजबूत होते. त्यामुळे दूध आणि केळी वेगवेगळी किंवा एकत्र खाणे फायद्याचे आहे.

३) बटाटे : बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि जटिल साखर असते. बटाटे खाण्याने तोंडाची गेलेली चव येते आणि वजनही वाढते. त्यामुळे तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर, आपल्या आहारात बटाट्याचा समावेश जरूर करावा. ज्यामुळे वेगाने वजन वाढण्यास मदत होईल.

४) हरभरा – काळा हरभरा भिजवून अगदी दररोज खाल्ल्याने वजन वाढते शिवाय शरीरातील रक्ताची कमतरतासुद्धा दूर होते. त्यामुळे सकाळचा नाश्ता किंवा जेवण यात काळ्या हरभऱ्याचा समावेश नक्की करावा.

५) खजूर आणि दूध – एक ग्लास उकळलेल्या दुधामध्ये रात्रभर पाण्यात भिजवलेले खजूर किंवा खजूर पावडर मिक्स करा आणि त्याचे सेवन करा. यामुळे वजन वाढण्यास मदत होते आणि शरीराची ताकददेखील वाढते. जर आपल्याकडे खजूर नसेल तर खारीक देखील घेऊ शकता.

६) मनुका – रोज मूठभर मनुका खाल्ल्याने वजन लवकर वाढते. तसेच शरीरातील रक्ताचा अभावदेखील दूर होतो. जर आपण भिजवलेले मनुके खाल्ले तर ते अधिक फायदेशीर असते.

० लक्षात ठेवा :-
– वजन वाढविण्यासाठी जंक फूड, फास्ट फूड किंवा औषधे घेऊ नका. याचा शरीरावर वाईट परिणाम होतो.

– काही लोकांचे बारीक असणे अनुवांशिक असते. यामुळे, बरेच प्रयत्न करूनही वजन वाढत नाही. अशा परिस्थितीत मानसिक ताण ओढवणार नाही याची काळजी घ्या.