| |

डिजिटल स्क्रीन करते मुलांच्या मानसिक आरोग्याचे नुकसान; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकालची मुलं शारीरिक हालचाल करणारे खेळ, मैदानी खेळ, बुद्धीचे खेळ असे सगळे खेळ मोबाईल आणि लॅपटॉपवरच खेळतात. त्यामुळे मुलांच्या शरीराची हालचाल होत नाही. याशिवाय मूळ तासनतास मोबाईल घेऊन बसलेली दिसतात. सतत बोटांचा आणि डोळ्यांचा वापर करीत मुले स्वतःच्या शारीरिक आरोग्यास नुकसान पोहचवत असतात. अश्यावेळी पालकांनी वेळीच लक्ष न दिल्यास मुलांचे मानसिक आरोग्य देखील खराब होते. म्हणून आज आम्ही तुम्हाला तज्ञांनी सांगितलेल्या काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुमच्या मुलांच्या विकासासाठी सहाय्यक आहे. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याची लक्षणे:-

१) मुले चिडचिडी होतात.
२) जिद्दी होतात.
३) आक्रमक होतात.
४) कमी दिसणे.
५) डोकेदुखी.
६) एकांतात राहणे.
७) नैराश्यात जाणे.

० डिजिटल स्क्रीनमुळे होणारे नुकसान
१) सतत डिजिटल स्क्रीनचा वापर केल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. यामुळे डोळ्यांचे स्नायू दुखावले जातात आणि परिणामी दृष्टी कमी होते.
२) मुलांच्या शरीराची हालचाल कमी झाल्यामुळे मुले सुस्त होतात.
३) सतत मोबाईलवर खेळताना मुलांच्या हाताच्या बोटांची हालचाल एकाच पद्धतीने होत असते. यामुळे अनेकदा बोटे कमकुवत होतात.
४) डिजिटल स्क्रीनमुळे मुलांचे लक्ष सतत स्क्रीनमध्ये गुंतलेले असते. यामुळे मुलं इतर कोणता विचार करण्याची सक्षमता हळूहळू गमावतात. परिणामी मुलांची विक्सनशीलता कमी होते.
५) मुलांमधील काल्पनिकता आणि विचार करण्याची क्षमता लोप पावते.

० काय सांगतात तज्ञ?

तज्ञ सांगतात कि,
१) चार तासापेक्षा जास्त कोणत्याही स्क्रीनवर वेळ घालवणे मुलांना मानसिक आजारांकडे ढकलते. यामुळे मुलांना शारीरीक खेळांमध्ये सक्रिय करण्याची आवश्यकता आहे. ऑनलाइन काम करताना काही अंतराने ब्रेक घेणे आवश्यक आहे.

२) कोरोना काळात शिक्षण ऑनलाइन झाल्याने मुलांना मोबाइल आणि लॅपटॉप सहज उपलब्ध झाले आहेत. मात्र आपल्या मुलांना अभ्यासाव्यक्तिरिक्त विरंगुळ्यासाठी अश्या स्क्रीनचा वापर करून देऊ नका.

३) पालकांनी जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत घालवावा. यामुळे मुलांना खेळण्यासाठी सवंगडी आणि बोलण्यासाठी आपले पालक मिळतील. परिणामी मुले डिओजिटल स्क्रीनमध्ये गुंतून राहणार नाही.

४) मुलांना मानसिक तणावापासून वाचण्यासाठी नेहमी त्यांना आनंदी ठेवा. मुलांना लहानपणापासूनच आवश्यक आणि गरजेच्या गोष्टींचे मूल्य समजावून सांगा.

५) मुलांना शिस्त लावताना बळजबरी करू नका. मुलांना त्यांच्या कलाकलाने उदाहरणे देऊन गोष्टी पटवून द्या.