desk yoga

अशा पद्धतीने करा ‘डेस्क योगा’

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  कामाच्या व्यापाने आपल्याला आपल्या शरीराला जेवढा वेळ देणें आवश्यक आहे . तेवढा वेळ मात्र देऊ शकत नाही . आजच्या तंत्रयुगात जवळपास सगळी कामे हि डेस्कटॉप वर केली जात आहेत . प्रत्येक जण हा  कॉम्पुटर आणि लॅपटॉप च्या जमान्यात  वावरत आहेत.  त्यामुळे  इंटरनेट   हि काळजी गरज झाली आहे .  त्यामुळे अगदी    छोट्या छोट्या कामांसाठी सुद्धा  लॅपटॉप  वापरावे लागते . सतत वापर  जास्त असल्याने  आपल्याला हाताच्या समस्या या जाणवायला सुरुवात होत आहेत . अश्या वेळी हाताचे काही व्यायाम करणे हे आवश्यक आहे. पण ऑफिस च्या वेळेत सुद्धा पटकन काही व्यायाम करू शकतो. त्यामुळे आराम  मिळायला मदत होते.

धावपळीच्या काळात अनेक लोक हे डेस्कटॉप च्या व्यायामाला महत्व देत आहेत . कारण कामातून आणि व्यापातून वेळ काढत मॅट घेत व्यायाम करणे हे प्रत्येकालाच शक्य आहे असे नाही . मागील काही वर्षांपासून संगणकाचा वापर हा जास्त प्रमाणात होत असल्याने अनेकांना हाताच्या समस्या या निर्माण होत आहेत . हाताला मुंग्या येणे , पाठीचे दुखणे वाढणे , तसेच मान दुखणे अश्या समस्या या जास्त प्रमाणात जाणवायला लागल्या आहेत . अश्या वेळी साध्या पद्धतीने व्यायाम करणे आवश्यक आहे.

आपण ऑफिस मध्ये आपल्या खुर्चीवर बसून सुद्धा आपण मानेचे व्यायाम करू शकतो. मानेला लवचिक पणा येण्यासाठी असे व्यायाम हे फार लाभकारी आहेत. योगिक स्ट्रेचिंग द्वारे काम करून आपल्या मानेच्या समस्या दूर करू शकता . आपण बसल्या जागेवर प्राणायाम करून श्वासाच्या समस्या या दूर करू शकतो. दर २० मिनिटांनी आपले डोळे हे स्क्रीन पासून दूर होण्यासाठी काही प्रमाणात मानेचे व्यायाम करताना डोळे बंद करून असे व्यायाम केले असता . तेवढाच डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होऊ शकते. आपल्या डोळ्यांवर काही मिनिटांनी पाणी शिंपडले तर डोळ्यांना आराम मिळेल.