| |

अवघडलेल्या मानेसाठी करा घरगुती उपाय आणि मिळवा आराम; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा आपण रात्री झोपताना डोक्याखाली हात आणि मानेखाली उशी घेतो. यामुळे काहीवेळ आपल्याला बरे वाटते पण मानेची वाट लागते. कारण व्यवस्थित न झोपल्यामुळे आणि झोपताना मानेखाली उशी आल्याने मानेचे स्नायू दुखावतात. याशिवाय कधीकधी वेडेवाकडे झोपण्याच्या सवयीमुळे मानेला हिसका बसतो आणि मान अवघडते. अशावेळी आपल्याला साधं वळून पाहायचं म्हटलं तरीही अवघड जातं. इतर अवयवांच्या वेदना जितक्या त्रास देणाऱ्या असतात तितक्याच मानेच्या वेदनाही खूप असह्य असतात. त्यामुळे मानेच्या या समस्येवर वेळीच काही घरगुती उपाय केल्यास अवघडलेली मान त्रास देणार नाही आणि आराम मिळेल. चला तर जाणून घेऊयात अवघडलेल्या मानेवर करायचे घरगुती उपाय खालीलप्रमाणे :-

१) झोपेत वाकडं तिकडं झोपल्याने तुमची मान अवघडली असेल तर मानेच्या ज्या भागावर वेदना होत आहेत त्या भागावर लक्ष द्या. जर दुखणारी जागा उजव्या बाजूला वा पाठीमागच्या उजव्या बाजूला असेल तर उजवा आणि ह्या वेदना जर डाव्या दिशेला असतील तर डावा हात उचला. साधारण २ मिनिटे हात हवेत स्थिर ठेवा. यामुळे फायदा होईल.

२) अवघडलेल्या जागी हातांच्या बोटांनी विशिष्ट पद्धतीने प्रेशर तयार करा आणि दुखणारा भाग दाबा. सुरवातीला तुम्हाला अगदी कळ जाईल आणि वेदना जाणवतील. मात्र नंतर अगदी काहीच मिनिटांत आराम मिळेल.

३) दुखणार्‍या भागाच्या विरुद्ध दिशेने तुमची मान वळवण्याचा प्रयत्न करा. मात्र हिसका न देता. त्यानंतर तिरक्या बाजूने डोके झुकवून हाताला हनुवटी चिटकवण्याचा प्रयत्न करा. यामुळे हळूहळू जखडलेला भाग मोकळा होण्यास आणि तेथील वेदना कमी होण्यास सुरवात होईल.

४) मान आणि पाठीच्या वरच्या भागाला स्ट्रेच करा. यासाठी दुखणाऱ्या भागाच्या विरुद्ध दिशेचा हात मानेकडून पाठीवर खालच्या बाजूस विरुद्ध हाताने धरा आणि स्ट्रेच करा. असे केल्याने दुखावलेले स्नायू हळूहळू मोकळे होण्यास मदत होईल.

५) जर उशी घेतल्यामुळे मन लचकणे, स्नायू दुखावणे असे त्रास होत असतील तर सगळ्यात आधी उशी आणि अगदी डोक्याखाली हात घेणं बंद करा.

६) मानेच्या वेदना असह्य असतील तर तिळाचे तेल हलके गरम करून मसाज करा. यानंतर विटेच्या साहाय्याने शेक द्या. यामुळे स्नायू मोकळे होतील आणि आराम मिळेल.

७) कोणत्याही उपायाने आराम मिळत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पेन किलर घ्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *