| |

गर्भारपणात चुकूनही ‘या’ भाज्यांचे सेवन करू नका, अन्यथा होतील गंभीर परिणाम; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। एका स्त्रीच्या आयुष्यात आपल्या गर्भात वाढणाऱ्या जिवापेक्षा इतर कुणीच अधिक महत्वाचे नसते. कारण गर्भधारणा हि एक विशेष भावना आहे. एक अशी अनुभूती जी एका स्त्रीला आई बनविते. गर्भधारणेच्या काळात आनंदासोबतच जबाबदारी सुद्धा येते. एक जीव आपल्यातच सांभाळणे आणि हळू हळू त्याचे या जगात येण्यासाठी संगोपन करणे. हि निश्चितच काही साधी सुधी बाब नाही. गर्भधारणेदरम्यान स्त्रियांना न जाणे कित्येक असह्य वेदनांना सामोरे जावे लागते. गर्भवती महिलांसाठी सातवा आणि नववा महिना खूप कठीण असल्याचे मानले जाते. या संपूर्ण नऊ महिन्याच्या कालावधीत स्त्रियांनी स्वतःची आणि स्वतःच्या गर्भाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

गर्भारपणात स्त्रियांनी आपल्या दैनंदिन जीवन शैलीत बदल करणे गरजेचे आहे. खाणे, पिणे, झोपणे या सर्व सवयींचा स्त्रियांच्या आरोग्यासह त्यांच्या गर्भात वाढणाऱ्या मुलावर प्रभाव पडत असतो. शिवाय गर्भवती महिला स्वतः जे खातात त्यातून मिळणारे पोषण त्यांच्याबळाला देखील मिळत असते. परंतु बहुतांश महिला असे पदार्थ सेवन करतात की ते गर्भात वाढणाऱ्या त्यांच्या बाळाला अधिक घातक ठरतात. त्यामुळे महिलांनी गर्भावस्थेत कोणत्या भाज्यांचं सेवन करू नये, याबाबत आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. याच संदर्भातील विशेष माहिती आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून देणार आहोत.

१) कोबी – मुख्य करून गरोदरपणात हिरव्या पालेभाज्या खाण्याचा विशेष सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. यात अनेको भाज्यांचा समावेश असला तरी गर्भवती महिलांनी कोबीचे अतिसेवन करू नये. कारण कोबीमध्ये कीटकनाशके आणि बुरशी त्याच्या पानांमध्ये दडली असण्याची शक्यता अधिक असते. यामुळे अशा भाज्या खाल्ल्यास एलर्जी किंवा इतर समस्या होऊ शकतात. यामुळे बाळालादेखील त्रास होण्याची शक्यता असते.

२) वांगी – गर्भारपणात हिरवी काय आणि काळी काय. दोन्ही वांगी खाणे टाळाल तितके तुमच्या गर्भासाठी चांगले आहे. कारण, ज्या मातीत वांग्याची लागवड केली जाते, त्यात टॉक्सोप्लाझ्मोसिस नावाचा घटक आढळतो. ज्यामुळे गर्भपाताचा धोका अतिशय वाढतो. याशिवाय जास्त प्रमाणात वांगी खाल्ल्यामूळे स्किन एलर्जी होऊ शकते. इतकेच नव्हे तर, गरोदरपणात पचनक्रिया मंदावलेली असते. यामुळे पचनक्रियेवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. काहींना बद्धकोष्ठतेचा त्रासदेखील होण्याची शक्यता असते.

३) आलं – गर्भावस्थेत उष्ण पदार्थ खाणे प्रामुख्याने टाळावे. यामुळे तुमच्या गर्भाला धोका आहे. त्यात आलं स्वभाव आणि गुणधर्माने उष्ण आहे. त्यामुळे गरोदरपणात महिलांनी आलं खाणं टाळावं. गर्भधारणेच्या सुरूवातीच्या तीन महिन्यांत आल्याचे सेवन केल्या गर्भपात होण्याचीदेखील शक्यता असते.

४) कारले – कारल्याचे अतिसेवन करणे देखील गर्भवती महिलांसाठी धोकादायक आहे. कारण यामुळे पोटदुखी, अपचन, अतिसार अश्या पोटाच्या तक्रारी संभवतात.

५) गाजर – गरोदरपणात गाजर अति खाल्ल्यास त्वचा पिवळी होते. कारण गाजरामध्ये कॅरोटीन असते आणि याचे जास्त सेवन केल्यास आपल्याला कॅरोटिनीमिया होऊ शकतो. इतकंच नव्हे तर गाजरातील ‘व्हिटॅमिन ए’चे प्रमाण गर्भवाढीस अडथळा निर्माण करतात.

६) पपई – गरोदरपणामध्ये पपईचे अजिबात सेवन करू नये. ना हिरवा पपई ना नारंगी. कारण पपई उष्ण गुणधर्मयुक्त असतो. ज्यामुळे गर्भपाताची शक्यता बळावते.