| | |

जेवल्यानंतर चहा पिऊ नका, अन्यथा भोगावे लागतील दुष्परिणाम; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। चहाप्रेमींची संख्या फार मोठी आहे. जरासा कंटाळा आला कि हातात चहा हवाच. काहींना तर सकाळी उठल्या उठल्या अंथरुणातच चहा लागतो. तर काही लोक इतके अतरंगी असतात कि त्यांना जेवणानंतर लगेच चहा प्यायला लागतोच. आता चहा पिणे चुकीचे आहे असे आमचे अजिबात म्हणणे नाही. हा पण चहा कधी प्यावा याला काळ वेळ असायला हवाच. कारण चहामध्ये असलेले कॅफिन शरीरात कोर्टिसोल किंवा स्टिरॉइड संप्रेरक वाढवून आरोग्यास हानी पोहोचवते. तज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर ताबडतोब चहा पिणे योग्य नाही. कारण हि सवय आपल्या अन्नातील अनेक महत्त्वपूर्ण पोषकद्रव्ये शोषण्यास अडथळा आणू शकते. तसेच चहामधील टॅनिन आपल्या आहारातून लोह आणि प्रथिने शोषून घेण्यास अडथळा निर्माण करते. ज्यामुळे पाचन रस कमी होते आणि याचा पचन संस्थेवर परिणाम होतो. जाणून घेऊयात जेवणानंतर चहा पिण्याने शरीरावर काय परिणाम होतो ते खालीलप्रमाणे:-

१) जेवणानंतर चहा पिण्याची सवय उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण करू शकते. कारण चहामध्ये कॅफिन असते. त्यामुळे जेवणानंतर चहाचे सेवन केल्यास रक्तदाबाची समस्या उद्भवते.

२) या सवयीमुळे हृदयरोग होण्याचीही शक्यता बळावते. कारण दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यानंतर चहा पिण्यामुळे स्ट्रोकची संभाव्यता असते. परिणामी हृदयविकार होऊ शकतो.

३) जेवणानंतर चहाचे सेवन केल्यास पाचन तंत्र कमकुवत होते आणि शरीरात अॅसिडचे प्रमाण वाढते. ज्यामुळे अन्न पचायला त्रास होतो.

४) जेवणानंतर चहा प्यायल्याने शरीरातील लोह कमी होते. यामुळे रक्ताचा अभाव निर्माण होतो. याशिवाय चहामध्ये आढळणारा फिनोलिक कंपाऊंड लोहाच्या शोषणात हस्तक्षेप करतो. शिवाय जेवणानंतर चहा प्यायल्याने शरीर प्रथिनांसह शरीरासाठी आवश्यक असणारी पोषकद्रव्ये आत्मसात करू शकत नाही. परिणामी शरीर कमकुवत व अशक्त होते.

५) डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी चहा कितीही उत्तम घरगुती उपाय असला तरीही जेवणानंतर चहा प्यायल्याने शरीरात वायू निर्माण होतो. परिणामी डोकेदुखीची समस्या बळावते.