Do not eat these foods when you wake up

झोपेतून उठल्या उठल्या हे पदार्थ नका खाऊ अजिबात

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी काही प्रमाणात पदार्थ हे खाल्ले पण गेले पाहिजेत. अनेकांना सकाळी उठल्या उठल्या पोटात भूक लागल्याची जाणीव होते. पण काहीच न करता , सकाळी उठल्या उठल्या काही पदार्थ खाणे हे आपल्या शरीराला धोकादायक ठरू शकते . अनेक वेळा डॉक्टर सांगतात कि , सकाळी नाश्ता केला पाहिजे. पण रिकाम्या पोटी कोणतेच पदार्थ अजिबात खाऊ नयेत. एक ठराविक प्रकारची विश्रांती मिळाल्यानंतर मात्र आपल्या शरीराला ठराविक ऊर्जेची गरज हि असतेच . त्यावेळी नाश्ता याची गरज हि जास्त असते. पण कोणते पदार्थ हे नाश्ताला वापरले जाऊ नयेत याची माहिती घेऊया ….

—- . मसालेदार आणि तिखट पदार्थ

प्रत्येकाला मसालेदार आणि चटपटीत पदार्थ हे आवडत असतात. परंतु त्यामुळे पचनाच्या समस्या या निर्माण झाल्या आहेत. तुम्हांला पचनविषयक पोटविषयक काही समस्या नको असतील तर, प्रत्येकाने हे मसालेदार चटपटीत पदार्थ हे सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी खाणे टाळणे आवश्यक असते. त्यामुळे ऍसिडीटी किंवा गॅस्टिक अल्सर सारख्या समस्या निर्माण करतात.

—- साखरयुक्त पदार्थ आणि पेय

गोड पदार्थ कोणला आवडत नाही, सगळ्यांचा गोड पदार्थ हे खायला आवडतात, पण सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी जर तुम्ही अति प्रमाणत गोड पदार्थ किंवा पेये याचे सेवन केले तर तुमच्या रक्तातील साखर वाढेल आणि यामुळे तुमच्या यकृतावर आणि स्वादुपिंडावर दबाब येऊन त्यांच्या कार्यामध्ये समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

— आंबट फळे

सायट्रिक असलेली फळे जर घेतली तर मात्र ऍसिडिटी चे प्रमाण हे वाढत जाते. टोमॅटो सारख्या भाज्या देखील रिकाम्या  पोटी खाणे टाळावे याने ऍसिडिटी किंवा गॅसेससंबधी समस्या वाढण्याची शक्यता असत.

— कच्च्या भाज्या

सकाळी सकाळी कच्या भाज्या पचवणे हे फार अवघड जाते. त्यामुळे पोटाच्या समस्या या जास्त प्रमाणात निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पॉट डब्बा होणे पॉट दुखणे असे त्रास होण्याची शक्यता असते.

 

— कॉफी

कॉफी हि शरीराला अपायकारक आहे. जरी कॉफीमुळे शरीराला कोणतेही काम करण्याचा उत्साह येत असला तरीही त्यामुळे पोटात जळजळ वाढण्याची शक्यता हि जास्त असते.