| | |

हिवाळ्यात ‘हे’ पदार्थ अजिबात खाऊ नका, नाहीतर..; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आता हळूहळू अलगद स्पर्श करणाऱ्या थंड वाऱ्यांची झुळूक जाणवू लागली आहे. अर्थातच काय तर ऋतुचक्रानुसार हिवाळ्याचे वारे वाहू लागले आहेत आणि थंडी जाणवू लागली आहे. थंडीमध्ये आपले बाह्य अंग सर्वसाधारणपणे अतिशय थंड असले तरीही आंतर अंग सुरळीत तापमानात स्थित असते. परंतु तरीही अनेकदा असे होते कि आपण खाल्लेले अन्न पचविण्यास जड जाते. त्यामुळे विविध त्रास संभवतात. म्हणूनच हिवाळ्यात काय खावे? आणि काय पाहू नये? असे दोन मुख्य प्रश्न समोर येऊन ठाकतात. यात सगळ्यात जास्त विचार केला जाणार प्रश्न म्हणजे काय खाऊ नये? तर मित्रांनो, आता चिंता करू नका. कारण आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे अगदी साधे सोप्पे उत्तर देणार आहोत. आम्ही तुम्हाला त्या पदार्थांविषयी सांगणार आहोत जे पदार्थ तुम्ही या हिवाळ्यापासून प्रत्येक हिवाळ्यात खाणे टाळा. म्हणजे आरोग्याची चिंता करायची गरज भासणार नाही. चला तर जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) थंड पाणी – हिवाळ्याच्या दिवसात सर्वत्र वातावरण थंड असते. पण अनेकदा हिवाळ्यात दुपारी ऊन आणि रात्री थंडी असे काहीसे वातावरण जाणवते. यामुळे अनेकदा अशावेळी दुपारी उन्हातून आल्यानंतर फ्रिजमधील पाणी प्यावे वाटते. पण प्रामुख्याने हे थंड पाणी पिणे टाळा. अन्यथा, सर्दी आणि पडसे तुमचा पिच्छा सोडणार नाहीत.

२) दही – थंडीच्या दिवसात फ्रिजमध्ये ठेवलेले दही खाणे टाळा. कारण हिवाळ्याच्या दिवसात थंड पदार्थ खाणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. तसेच या दिवसात सामान्य तापमानावरील दही खाण्यानेदेखील त्रास संभवतो. दह्याचे सेवन केल्याने विविध त्वचा विकार होण्याची शक्यता असते. यात एक्झिमा, स्राव येणारे विकार, सोरीयासिस हे विकार होण्याची शक्यता असते. तसेच दह्याने कफ वाढतो. त्यातून घशाचे आजार, वारंवार सर्दी, ताप येऊ शकतो. ताक किंवा कमी प्रमाणात दही खाण्याची इच्छा असल्यास दुपारच्या वेळी कमी प्रमाणात सेवन करावे.

३) थंड दूध – अनेकांना रात्री दूधाचे सेवन करुन झोपण्याची सवय असते. परंतु, थंडीच्या दिवसात रात्री झोपताना गरम दूध प्या. फ्रिजमधील थंड दुधाचे सेवन केल्यास आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.

४) तेलकट पदार्थ – अनेकदा थंडीच्या दिवसात गरमागरम भजी आणि चहा हवाच. असे प्रत्येकाला वाटते. मात्र, थंडीच्या दिवसात तेलकट पदार्थ खाणे टाळा. कारण तेलकट पदार्थांमुळे विविध अॅलर्जी होण्याची शक्यता असते.

५) ब्रेड आणि भात – थंडीच्या दिवसात हलका आहार घेणे अधिक लाभदायक असते. त्यामुळे या दिवसात ब्रेड आणि भात खाणे टाळा. परंतु, आवड असल्यास याचे प्रमाण अतिशय कमी असावे याची काळजी घ्या.

६) लिंबू सरबत – हिवाळ्याच्या दिवसात लिंबाचे सरबत पिणे आरोग्याच्या दृष्टीने सोयीस्कर मानले जात नाही. लिंबू कितीही आरोग्यदायी असला तरीही थंडीच्या दिवसात लिंबू पाणी प्यायल्यास सर्दीसारखे आजार बळावू शकतात. शिवाय टॉन्सिल्सदेखील वाढण्याची शक्यता असते.

७) कोल्ड्रिंक्स – हिवाळ्याच्या दिवसात मुळात थंड खाणे पिणे टाळावे. शिवाय कोल्ड्रींक्समध्ये असे अनेक घटक असतात जे घश्याचे त्रास वाढवितात. त्यामुळे थंडीच्या दिवसात कोल्डड्रिंक्स नकोच.