irregular menstruation
| |

अनियमित पाळीची कारणे दुर्लक्षित करू नका; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। प्रत्येक स्त्रीला दर महिन्याला येणारी पाळी ही अगदीच सामान्य बाब आहे. दरम्यान या दिवसांमध्ये होणारा रक्तस्त्राव, पोट, पाय, कंबर दुखणे, डोकं जड होणे वा वजन वाढणे या गोष्टी सर्रास महिलांना होतात. अनेकदा हे त्रास वाढलेच तर डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. पण रिपोर्टनुसार, गेल्या काही वर्षात तरुण मुलींमध्ये पाळी उशीरा येणे, पाळी महिन्यापेक्षा लवकर येणे वा बराच काळ रस्तस्त्राव होणे या समस्या दिसून येत आहेत.

बऱ्याच मोठ्या गॅपने पाळी येणे किंवा वेळेच्या आधी पाळी येणे यामागे काही कारणे असतात. अनेकदा स्त्रियांच्या हि कारणे लक्षातही येतात पण याकडे अगदीच दुर्लक्ष केलं जातं. परिणामी हे साधे सुधे वाटणारे त्रास गंभीर आजारांकडे ओढू लागतात. त्यामुळे प्रत्येक मुलीला अनियमित पाळीची कारणे माहित असणं अतिशय आवश्यक आहे. तसेच फक्त असंतुलित हार्मोन्स इतकेच कारण असू शकत नाही हे लक्षात घ्या आणि इतर करणे खालीलप्रमाणे जाणून घ्या.

१. चुकीची जीवनशैली - आपण आपल्या दैनंदिन जीवनात काय करतो याचा आपल्या 
शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे आपला आहार, झोप, व्यायाम, व्यसने या सवयी आपल्या  आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतात. शिवाय सतत जंक फूड खाल्ल्यानेही पाळीवर  परिणाम होतो. पुरेशी झोप न मिळणे, व्यायामाचा अभाव यांसारख्या गोष्टींमुळेही मासिक पाळी अनियमित होऊच शकते. तसेच आजकाल दारु, सिगारेट अशी अनेक व्यसने महिलादेखील करतात. याचा शरीरावर आणि पाळीवर परिणाम होतो. त्यामुळे वेळीच सावध व्हा.

२. मानसिक ताणतणाव - आजकाल जो तो पैश्याच्या मागे धावताना शिक्षण, करीयर, कौटुंबिक अशा प्रत्येक कारणांमुळे तणावात दिसतो. याचा महिलांच्या पाळीवर परिणाम होतो. कारण सतत तणावात असल्यामूळे पाळी नेहमीपेक्षा खूप लवकर येते. त्यामुळे मानसिक स्थिती चांगली ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करा.
३. पाळीसंबंधित समस्या - आजकाल अनेक कारणांमुळे तरुणींमध्ये पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम, थायरॉईड, पॉलिप्स, पेल्विक इन्फ्लमेटरी डीसीज अशा समस्या दिसून येतात. यामध्ये हार्मोन्सचे असंतुलन हे मुख्य कारण असले तरी गर्भाशयाशी निगडीत समस्या यामुळे होतात. तसेच यामुळे पाळीशी निगडीत तक्रारी उद्भवतात. यात एकतर पाळी आली की खूप काळ सुरु राहते किंवा सातत्याने पाळी येते. तर काही वेळा कित्येक महिने पाळी लांबते.

४. गर्भनिरोधक गोळ्या - लग्नाआधी लैंगिक संबंध वा विवाहेतर लैंगिक संबंध ठेवण्याचे आजकालचे प्रमाण पाहता स्त्रियांना चुकून गर्भ राहिला तर गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या जातात.    तसेच कोणत्याही माहितीशिवाय वा योग्य त्या सल्ल्याशिवाय गर्भनिरोधक औषधे घेतल्याने त्याचे दिर्घकालिन परिणाम होतात.