| |

जेवणानंतर करू नका या चुका, नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आपला आहार अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो. कारण पौष्टिक आणि गरजेइतके ऍन ग्रहण केल्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. शिवाय अनेक आजारांपासून आपला बचाव होत असतो. जेवताना वायफळ बडबड करू नये किंवा वाद करु नये, असे घरातले मोठे म्हणतात. मात्र, या गोष्टीला सहसा कुणीच गांभीर्याने घेत नाही आणि याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो. शिवाय अनेकांना जेवणानंतर कोल्ड ड्रिंक पिणे, चहा पिणे किंवा अंघोळ करण्याची सवय असते. मात्र तुम्हाला हे ठाऊक आहे का? या सवयी आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहेत. माहित नसेल तर लगेच जाणून घ्या पुढीलप्रमाणे:-

१) जेवणानंतर चहा किंवा कॉफीसारखे गरम पदार्थ पिणे – अनेकांना जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी प्यावीशी वाटते. मात्र तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार, जेवणाच्या एक तास आधी किंवा नंतर चहा किंवा कॉफीचे सेवन करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. कारण त्यामध्ये असलेले टेनिन केमिकल जेवणातील अत्याधिक लोह शोषून घेतात. त्यामुळे शरीराला पुरेसे लोह मिळत नाही. शिवाय शरीरात असलेल्या लोहाचे प्रमाण कमी होते. परिणामी तुम्हाला अॅनिमियासारख्या आजाराचा घास व्हावे लागेल.

२) जेवणानंतर सिगारेट पिणे – मुळात म्हणजे सिगारेटचे व्यसनच अतिशय वाईट आहे. तरीही अनेक लोक सिगारेट पिण्याच्या आधिन असतात. आपण सारेच जाणतो कि, सिगारेट आपल्या शरीरास हानिकारक आहे. मात्र मुख्य करून जेवणानंतर सिगारेट पिण्याने शरीराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. जेवणानंतर सिगारेट पिणे म्हणजे एकावेळी दहा सिगारेट पिण्याबरोबरचे शारीरिक नुकसान होय. त्यामुळे तुम्हालादेखील जर सिगारेटची वाईट सवय असेल तर वेळीच हि सवय मोडा.

३) जेवणानंतर अंघोळ करणे – जेवणानंतर अंघोळ केल्याने शरीराचे तापमान लगेच कमी होते. याचा परिणाम रक्ताभिसरण प्रक्रियेवर होतो. परिणामी अनेक अवयवांपर्यंत रक्त पुरविणाऱ्या पेशी कमकुवत होतात आणि विविध भागांपर्यंत रक्तपुरवठा होत नाही. यामुळे अनेक रोग होण्याशी शक्यता संभवते.