| | |

कांदा आणि लसणीच्या साली फेकून देऊ नका, कारण..; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या आहारात कांदा आणि लसूण हे दोन पदार्थ प्रामुख्याने आढळतात. कारण याशिवाय जेवणाला चवच येत आंही असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्वयंपाक करताना बहुतेक घरात कांदा आणि लसणाचा वापर होतोच. हे पदार्थ वापरताना त्याच्या साली काढून टाकल्या जातात. पण तुम्हाला माहित आहे का? या पदार्थ्यांच्या ज्या साली आपण फेकून देतो त्या खरंतर आरोग्यासाठी बरेच फायदे देऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल ते कसं काय? तर यासाठी तुम्हाला हा लेख पूर्ण वाचावा लागेल. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) पदार्थाची चव वाढवते – पदार्थाची चव वाढवण्यासाठी कांदा आणि लसूण यांच्या साली हलक्या भाजून घ्या आणि त्याची पावडर तयार करा. हि पावडर कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. इतकेच काय तर पदार्थांचा सुगंधदेखील छान येतो.

२) सूप बनवा – कांदा आणि लसणाच्या सालीचा वापर करून आपण चविष्ट आणि पौष्टिक असे सूप तयार करू शकतो. यामुळे सूपची चवदेखील वाढते आणि यातून आपल्याला पोषक घटकही मिळतात. हे सूप तयार झाल्यानंतर गाळणीने गाळूण वा चमच्याने साली बाजूला काढून सूपचा स्वाद घेता येईल.

३) कोलेस्ट्रॉल कमी होईल – यासाठी कांद्याची साल रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते पाणी प्या. यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. या पाण्याची चव फारशी चांगली लागत नाही त्यामुळे यात थोडी साखर मिसळावी. हे पाणी दररोज घेतल्यास कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तसेच लसूण पाकळीसकट खाल्ल्याने शरीरातील अनावश्यक चरबी निघून जाते.

४) स्नायूंचे दुखणे दूर – या सालींमध्ये अनेको पोषक घटक असतात. यांचा वापर करून स्नायूंच्या दुखण्यावर आराम मिळतो. त्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करून त्यामध्ये कांद्याच्या साली घाला. हे पाणी कोमट झाल्यास गाळून प्या. यामुळे दुखण कमी होईल.

५) केसांसाठी फायदेशीर – कांद्यामध्ये सल्फर असते. यामुळे कांडा केसांच्या मुलांसाठी फायदेशीर मानला जातो. यासाठी कांद्याच्या साली ४-५ कप पाण्यात उकळवा आणि केस शाम्पूने धुतल्यानंतर या पाण्याचा वापर करा.

६) खत – कांदा आणि लसूण यांच्या सालीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्नसारखे घटक असतात. यामुळे या सालींचा वापर आपण एक उत्तम खत म्हणून करू शकतो.