| | | |

घुर्र… घर्रर्रर्र.. घोरण्यावर करा अस्सल जालीम उपाय; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। किती साहजिक क्रिया आहे घोरणं.. अगदी नैसर्गिक क्रिया. मात्र तरीही एका मर्यादेनंतर त्रासदायी. तुम्हालाही घोरण्याची सवय आहे का? तर काळजी करू नका आम्ही तुमची स्थिती समजू शकतो. निश्चितच घोरणे हा काही रोग किंवा गंभीर आजार नाही. मात्र पाहुण्यांकडे गेल्यावर किंवा मित्रांसोबत फिरायला गेल्यानंतर मात्र या सवयीमुळे थोडंसं बावरायला होत. मग काय? असे लोक रात्री झोपणं तरी टाळतात नाहीतर बाथरूममध्ये डुलकी काढतात. हा झाला विनोदाचा भाग मात्र अनेकदा घोरण्याची हि सवय जोडीदारासोबतच्या वादाला तोंड फोडते. म्हणूनच या समस्येवर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असते. मित्रांनो घोरण्याच्या समस्येमागील मुख्य कारण आहे, खूप थकवा किंवा नाक बंद होणे. अशा परिस्थितीत तुम्ही अगदी घरगुती उपायांनी या समस्येवर मात करू शकता. जर तुम्हाला हे उपाय माहित नसतील तर लगेच जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) हळद दूध – आयुर्वेदापासून आजीच्या बटव्यापर्यंत हळदीचा उल्लेख एक बहुगुणी औषधी आणि रामबाण उपाय म्हणून केलेला आहे. घोरण्याच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर दररोज झोपण्याच्या अर्धा तास आधी हळद मिसळलेले कोमट दूध प्या.

२) देशी तूप – घोरण्याच्या समस्येवर एकदम प्रभावी उपाय म्हणजे देशी तूप. यासाठी फक्त रात्री झोपायच्या आधी कोमट तूप ड्रॉपरच्या मदतीने २ थेंब नाकपुड्यांमध्ये घाला. त्यामुळॆ घोरणे अगदी काहीच दिवसात पूर्ण बंद होईल.

३) हिरवा वेलदोडा – दररोज झोपाण्याआधी कोमट पाण्यात हिरवा वेलदोडा अर्थात वेलची वा त्याची पूड मिसळून ते मिश्रण प्या. असे दररोज केल्यास घोरण्याची समस्या दूर होईल.

४) पुदिना ऑइल – घोरण्याच्या समस्येवर पुदिना तेल देखील प्रभावीरीत्या काम करते. यासाठी झोपण्याआधी पाण्यात पुदिन्याचे काही थेंब टाकून त्याच्या गुळण्या करा. यामुळे अनुनासिक छिद्रांची सूज कमी होईल आणि श्वास घेणे सोपे होईल. याशिवाय नाकाजवळ मिंट तेल लावल्यासही घोरण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

५) ऑलिव्ह ऑइल – ऑलिव्ह ऑईलमधील घटक श्वसनाच्या मार्गातील अडचण दूर करतात. परिणामी घोरण्याची समस्या दूर होते. रात्री झोपेच्या आधी ते मधात सेवन करणे फायद्याचे ठरते.

६) टि ट्री ऑइल – ब्लॉक नोज अर्थात श्वसन मार्गात आलेल्या अडचणींमुळे नाक बंद होणे वा कोरडे होणे. यामुळे घोरण्याचा त्रास होतो. यासाठी टि ट्री आॅईलचे २ थेंब पाण्यात घालून १० मिनिटे वाफ घ्या. यामुळे बंद नाक उघडेल आणि घोरण्याची समस्या दूर होईल.