| |

पायाच्या टाचा स्वच्छ करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपले सौंदर्य आपल्या हाती असे म्हटले जाते. खरंतर यात खोत काहीच नाही. कारण आपल्या सौंदर्याची निगा राखणं हि आपलीच जबाबदारी असते. अगदी डोक्यावरच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत आपल्या सौंदर्याची काळजी घेणे गरजेचे असते. पण असं होत कि अनेकदा आपण फक्त चेहराच जपतो मग मानेचं काय? नखांनी काळजी घेतो पण हातांच काय? पायांची काळजी घेतो पण टाचांच काय? काय? पडले ना तुम्हालाही हे प्रश्न. अनेकदा आपला या भागांकडे दुर्लक्ष होतो. मुख्य करून पायाच्या टाचा. कारण त्या फारश्या दिसण्यात येत नाहीत. पण त्यांची काळजी न घेतल्यामुळे नंतर त्रास होतो. यासाठी त्या नियमित स्वच्छ करणे गरजेचे असते.

पायात पैजण वा हिल्स घालताना अचानक पायाच्या टाचा काळवंडल्याचे आपल्या लक्षात येते. चालताना सतत मातीचा स्पर्श आणि बदलत्या वातावरणाच्या प्रभावामुळे आपल्या पायाच्या टाचा काळ्या पडतात. कधी कधी यामागे आपल्या शरीरातील मॅलानिनची निर्मितीदेखील कारणीभूत असू शकते. ज्यांच्या पावलांना खूप घाम येतो अशा लोकांची त्वचा दाह अर्थात शरीरातील उष्णता वाढल्यामुळे काळवंडते. मात्र या सर्व समस्यावर एक उपाय आहे आणि तो म्हणजे पायासोबत त्याच्या टाचांचीसुद्धा योग्य निगा राखली पाहिजे. पण मग घरच्या घरी पायाच्या टाचांची काली कशी घ्यायची? कश्या स्वच्छ करायच्या टाचा? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर काळजी करू नका. कारण आज आपण असेच काही घरगुती आणि सोप्पे उपाय जाणून घेणार आहोत. खालीलप्रमाणे:-

१) बेकिंग सोडा
० साहित्य
– एक चमचा बेकिंग सोडा
– एक चमचा गुलाब पाणी

० कृती – एका भांड्यात गुलाबपाणी आणि बेकिंग सोडा मिसळा आणि तयार मिश्रण पायाच्या टाचांवर एखाद्या स्क्रबप्रमाणे चोळा. पुढे १० मिनीटांनी पाय कोमट पाण्याने धुवा आणि टॉवेल अथवा जाड कापडाच्या मदतीने पाय घासून स्वच्छ करा. ज्यामुळे पायावरची डेड स्किन, धुळ आणि माती अगदी सहज निघून जाईल व पायाच्या टाचा कोमल मुलायम स्वच्छ होतील.

० फायदा – बेकिंग सोड्यामध्ये ब्लिचिंग करणारे घटक असतात. शिवाय सोडा अॅंटि बॅक्टेरिअल असल्यामुळे तुमच्या पायाला इनफेक्शनचा धोका कमी होतो.

२) लिंबू साखर
० साहित्य
– एक वापरलेलया लिंबाची साल
– एक चमचा साखर

० कृती – लिंबू वापरल्यावर साल फेकून न देता त्याच्या सहाय्याने पायाच्या टाचा स्वच्छ करण्यासाठी वापर करा. यासाठी वापरलेल्या लिंबाच्या सालीवर थोडी साखर घ्या आणि टाचांवर रगडून टाचा स्वच्छ करा. पुढे अगदी ५-१० मिनीटांनी पाय स्वच्छ करा.

० फायदा – लिंबाच्या सालीमुळे टाचेवरील काळपटपणा दूर होतो आणि साखर एक नैसर्गिक स्क्रबर असल्यामुळे टाचेवरील खराब झालेली त्वचा मुळापासून स्वच्छ होते.

३) बटाटा
० साहित्य
– एक बटाटा

० कृती – एक बटाटा घ्या आणि तो सोलून त्याचे तुकडे टाचेवर रगडा. यानंतर टाच अशीच काही मिनिटे सुकू द्या. यानंतर १० मिनीटांनी टाचा कोमट पाण्याने स्वच्छ करून घ्या.

० फायदा – बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे त्वचेचा पोत उजळतो. शिवाय बटाट्यात आढळणारे ब्लीचिंग घटक आपली त्वचा मुळापासून स्वच्छ करतात.

४) हळद आणि दूध
० साहित्य
– दोन चमचे हळद
– गरजेनुसार दूध

० कृती – हळद आणि दूध दोन्ही घटक एकत्र करा आणि त्याची एक दाटसर पेस्ट बनवा. हि पेस्ट टाचेवर लावा. पुढे साधारण २० मिनिटे हि पेस्ट अशीच राहूद्या आणि त्यानंतर कोमट पाण्याने टाचा स्वच्छ करा.

० फायदा – हळदीमध्ये त्वचा उजळ करणारे घटक असतात. ज्यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाते आणि दूधामुळे टाचा कोमल व मुलायम होतात.

५) कोरफड आणि ग्लिसरिन
० साहित्य
– एक चमचा कोरफडीचा गर
– एक चमचा ग्लिसरिन
– एक व्हिटॅमिन ई कॅप्सुल

० कृती – एका भांड्यात कोरफडीचा गर, ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल असे तीनही पदार्थ एकत्र करा. यानंतर हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून पायाच्या टाचेवर लावा. पुढे १० मिनीटांनी कोमट पाण्याने पाय स्वच्छ करा आणि जाड कापडाच्या साहाय्याने टाचा रगडा. यामुळे टाचांवरील डेड स्किन निघून जाईल.

० फायदा – कोरफडीमुळे त्वचेवरील डेड स्केल निघून जातात तर व्हिटॅमिन ई’मूळे पायाच्या टाचांना पोषण मिळते.