maharashtriyan look
|

मराठी हटके लुक मिळवण्यासाठी अशी करा स्टाइल

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन ।  आजकाल मुलींना  नवीन नवीन लुक करायला फार आवडतात. नवीन लुक मध्ये मुलींचे सौदर्य हे अजूनच खुलून दिसायला सुरुवात होते. आजकाल मराठी हटके लुक केला तर आपल्या सौदर्यात लगेच वाढ होण्यास सुरुवात होते. अनेकदा मुलींना अश्या वेगळ्या प्रकारचा मेकअप करायचा असेल तर खूप वेळ लागतो. त्यावेळी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही मराठमोळा लुक बनवू शकता त्यासाठी कोणत्या प्रकारच्या टिप्स तुम्ही वापरू शकता हे जाणून घेऊया …

नऊवारी साडी म्हंटल कि , तिचा घेर हा खूप मोठा असतो आणि ती सांभाळणे सुद्धा खूप अवघड असते. अश्या वेळी मराठमोळा लुक करण्यासाठी नऊवारी काष्ठा साडी घातली तर तुमचा लुक हा पूर्णतः मराठमोळा होईलच तसेच तुमच्या सौदर्यात हि वाढ होण्यास सुरुवात होईल. नऊवारी साडी हि साधारण खूप जुन्या काळापासून महिला वापरत आलेल्या आहेत. पहिल्या काळातील महिलांचा पोशाख हाच नऊवारी साडी असायचा. या साडीत मात्र चेहरा हा खुलून दिसतो.

या साडीसोबत तुमच्या गळ्यात जुन्या काळातील डोरलं आणि साज असतो तो घातला कि तुमचे सौदर्य हे अजून खुलून दिसायला सुरुवात होते. तसेच त्याबरोबर एक छोटीशी नथ असेल तर तुम्ही शिवाजी महाराजांच्या काळातील स्त्रिया कश्या असतील अश्या रूपात तुमच्या पेहराव दिसायला सुरुवात होईल. केसांची वेगवेगळ्या पद्धतीने स्टाइल करण्यापेक्षा साधारण केसांची स्थिती ठेवली त्यामध्ये एखादा गजरा माळला तर मात्र तुमचा लुक डिसेन्ट दिसायला सुरुवात होईल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *